विकास कामत टक्केवारी न घेता आंम्ही जनता केंद्रस्थानी मानून त्यांचा सर्वांगीन विकास साधण्याचे काम करतो .
- अर्चनाताई पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल
जिप . उपाध्यक्ष असताना माझ्या कार्यकालात वितरीत झालेला निधी आणि जिल्ह्याचा खासदार म्हणून दिलेला निधी लावा हिशोब .
लोक प्रतिनिधी म्हणून रात्रीआपरात्री मतदार संघातील आलेले फोन घेणे हे कर्तव्यच परंतु माझ्या सेल्फीने मी निवडून येवू शकतो हा अविर्भाव चुकीचा तसं असेल तर मी महिलांसाठी राबविलेल्या हळदी कुंकु , यात्रा , सिनेमा यातुन मोठ्या लिडच्या मताधिक्याने निवडुन येईल .
हि लढाई कोण्या घराणेशाही किंवा भाऊबंदकीची नसून मोदींच्या ४०० आकडा पारची आहे .
कळंब तालुका म्हणजे आमच्या राजकीय कुटुंबातील पहिला घटक असुन नंतर तुळजापुर तालुका दुसरा घटक आहे यामुळे कळंबवरील पाटील कुटुंबाचे लक्ष कमी झालेय असे समजण्याचे कारण नाही .
देशभक्त न्युज - ईटकूर / प्रतिनिधी
धाराशिव लोकसभेच्या राजकीय आखाड्याने राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या शब्द फेकीच्या फैरीने नुकताच पेट घेतला असुन त्याचा प्रत्यय कळंब तालुक्यातील ईटकूर येथील दि . ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केलेल्या महायुतीच्या बैठक सभेच्या
माध्यमातुन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ( अजित पवार गट ) , शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) , रासप , रिपब्लिक पक्ष (आठवले गट ) मित्रपक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पदाधिकारी , कार्यकर्ते व मतदार यांच्या प्रमुख बैठक सभेवेळी महायुतीच्या उमेद्वार म्हणून अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील या बोलताना म्हणाल्या की ,विकास कामत टक्केवारी न घेता आंम्ही जनता केंद्रस्थानी मानून त्यांचा सर्वांगीन विकास साधण्याचे काम करतो अशा शब्दात त्यांनी विरोधी उमेद्वाराच्या कारभाचे वाभाडेच जनतेसमोर मांडले . याबरोबरच महाविकास आघाडीचे उमेद्वार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारातील " एक कॉल प्रॉब्लेम सॉल " या मुद्याची खिल्ली उडवत पाटील म्हणाल्या आपणाला ज्यांनी निवडून दिले त्यांचा आलेला फोन उचलून त्यांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडवणे हे तर आपले कर्तव्यच आहे त्यात नवं काय ?
हि लढाई कोण्या घराणेशाही किंवा भाऊबंदकीची नसून मोदी विरुद्ध गांधी अशी असुन मोदींच्या ४०० आकडा पारची आहे त्या ३९९ पैकी ४०० क्रमांकाचा आकडा माझा असुन केंद्रात पुन्हा बहुमताने मोदीं शहाचे सरकार आणण्यासाठी मला बहुमताने निवडुन देण्याची साद यावेळी पाटील यांनी उपस्थितांना साद घातली .
यावेळी पाटील यांनी जिल्ह्याच्या रेल्वेचा प्रश्न , सुशिक्षित बेकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी टेक्सटाईल पार्क , जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न , रस्ते , शेतकऱ्यांचा पिक विमा याबबत मोदी सरकाच्या काळात करण्यात आलेल्या जनतेच्या विकास कामांची माहिती दिली .
कार्यक्ररमाच्या प्रारंभी अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते महत्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
यावेळी व्यासपिठावर भाजपाचे कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे , सरपंच मोहराबाई कसपटे , ग्राप . सदस्य , अशाराणी पावले , मोटे यांची उपस्थिती होती .
तर कार्यक्रमास माजी . कृउबास सभापती रामहारी शिंदे ,माजी जिप . सदस्य बालाजी आडसुळ , माजी जिप . सदस्य मदन बारकुल , कळंब कृउबास . सदस्य अरुण चौधरी , भाजपा संलग्न चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष तथा धाराशिव लोकसभा एससी संपर्क लक्ष्मण शिंदे , भाजपाचे प्रदिप फरताडे , सचिन गंभीरे , शिवाजी आडसुळ , बिभिषण कुंभार , जिप . गट प्रमुख महादेव पावले , माजी सरपंच अभिमान आडसुळ , माजी उपसरपंच महादेव आडसुळ , ग्राप . सदस्य हनुमंत कसपटे , सत्यदेव जगताप , विनोद चव्हाण , ॲड . रामराजे जाधव , सरपंच प्रणव चव्हाण , अभिजित गंभीरे , प्रतिक आडसुळ ,आडसुळवाडी सरपंच या मान्यवरांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार तुकाराम शिंदे यांनी केले .
संपन्न झालेल्या धाराशिव लोकसभा प्रचार मेळावा सभेला ईटकूर सह कन्हेरवाडी , पाथर्डी , आथर्डी , गंभीरवाडी , भोगजी , बहुला , आडाळा , कन्हेरवाडी , आंदोरा , हावरगाव येथील मतदार , भाजया , राष्ट्रवादी अजित पवार गट , शिवसेना एकनाथ शिंदे गट , रासप , रिपाई पक्षाचे पदाधिकारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती .



