Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ईटकूर येथे बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 ईटकूर येथे बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 

देशभक्त - न्युज - ईटकूर / प्रतिनिधी 

कळंब तालुक्यातील ईटकर येथे बुद्ध पौर्णिमा २५६८ निमित्ताने दि . २३ मे रोजी येथील भिमनगरात सर्व समाज बांधव व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ईटकूर यांच्या वतीने संपन्न होणाऱ्या बुद्ध जयंतीचे मोठे नियोजन करण्यात येत असुन २३ मे रोजी सकाळी ठिक - ९ . ०० वाजता मान्यवरांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होईल . तथागत गौतम बुद्धाच्या मुर्तीस , प्रतिमेस धुपाने , पुष्पाने समाज बांधव वंदन करणार आहेत .

धम्मचारी बंन्धु सर्व बौद्ध उपासक , उपासिका , बालक , तरुण मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये त्रिशरण , पंचशिल , बुद्ध पुजापाठ पठन करतील सायंकाळी  ५ . ३० वाजता सजवलेल्या रथातुन शांततेचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीची  " बुद्धम् शरणम् गच्छामि " , धम्म् शरणम् गच्छामि " ,  " संघंम् शरणम् गच्छामि ".च्या जयघोषात पांढरे वस्त्र परिधान केलेल्या धम्म उपासक , बालक , बालीका , तरुण मंडळी हातात प्रज्वलित मेणबत्ती घेवून मोठ्या संख्येत भव्य दिव्य शांतता रॅली गावतील भिमनगर , साठेनगर , संत रोहीदास नगर, शिवाजी चौक या प्रमुख मार्गावरून भिमनगर बुद्ध विहाराकडे प्रस्थान करणार आहे . 

शेवटी हातातील प्रज्वलील मेनबत्ती ध्वजारोहन कठ्ठयावर ठेवऊन शांतता रॅलीची बुद्ध पुजा पाठाने सांगता होईल  व खिरदानाने कवि , गायक स्वितम इंगळे यांच्या संगितमय सामज प्रबोधनाच्या कार्यक्रमास ९ . ०० वाजता सुरुवात होईल .

सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमनगर मधील युवा भिमसैनिक देशभक्त चे  संपादक लक्ष्मण (तात्या ) शिंदे - पाटील पत्रकार अमोल रणदिवे , सुधाकर रणदिवे , राहुल रणादिवे , आत्माराम रणदिवे , सुनिल रणदिवे , तुकाराम शिंदे , धम्मचारी समंत बंन्धु , फुलचंद रणदिवे , आबासाहेब शिंदे , ॲड . सतिश रणदिवे , गौतम शिंदे , पांडुरंग शिंदे , युवराज शिंदे , युवराज रणादिवे , श्रामणेर वैजिनाथ शिंदे ,  , अक्षय शिंदे , सुरेंद्र शिंदे , जितेंद्र शिंदे , राजाभाऊ शिंदे ,  सुरेश शिंदे ,  , संजय आरकडे , निलेष शिंदे ,  कुंडलीक रणदिवे , रितेश लगाडे , किरण लगाडे , प्रेमकुमार शिंदे , बाळासाहेब शिंदे , बालाजी शिंदे ,यशपाल लोंढे , विश्वजित शिंदे , अनिकेत शिंदे  , आदित्य रणदिवे , लखन रणदिवे , रोहित रणादिवे , निलेष सिरसट , किशोर इनकर , पुरुषोत्तम शिंदे , सौरभ शिंदे , मंगेश शिदे , संदेश शिंदे , बाळराजे सोणवने , धम्मा रणदिवे आदिसह  शिंदे , रणदिवे , गाडे , सोणवणे , लोंढे , इनकर , कोकाटे  परिवार जोमाने कामाला लागले असुन मोठे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेत आहेत . 


                               " चर  चर  कापले " 

                  


कवि / फेम गायक स्वितम इंगळे प्रस्तुत सुर मैफिल प्रस्तुत संगितमय समाज प्रबोधनाच्या बहारदार कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे अवाहन भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ईटकूर यांच्या वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.