जमिनीची नोटीस काढून फेरफारला नोंद घेण्यासाठी ३ हजाराची लाच स्वीकारताना ईटकूर येथील अतिरिक्त पदभार असलेले तलाठी एसीबीच्या जाळ्यात.
देशभक्त न्युज - धाराशिव / प्रतिनिधी
शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने तलाठ्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत माहिती अशी की ,आरोपी कल्याण शामराव राठोड, वय-४३ वर्षे, धंदा-नोकरी, पद-तलाठी, सज्जा आंदोरा, अतिरिक्त कार्यभार- सज्जा ईटकुर, तालुका कळंब जिल्हा-धाराशिव. रा. ज्ञानेश्वर नगर, राजीव गांधी चौक, आयटीआय कॅालेजच्या पाठीमागे, जिल्हा बीड यांनी तक्रारदार यांचे भावाचे नावे खरेदी घेतलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी स्वतःसाठी व साहेबाला द्यावे लागतील असे म्हणून 14 मे रोजी तक्रारदार यांचेकडे 4000/- रु. लाच रकमेची मागणी करून तरजोडीअंती 3000/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून पोलीस स्टेशन कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांचा समावेश आहे.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय - 02472 - 222879 टोल फ्री क्रमांक.1064
