जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस कळंब येथे जोडे मारो आंदोल करून त्यांच्या कृत्याचा जाहिर निषेध
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे भान हरवलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्टंटबाजी करण्याच्या चक्कर मध्ये खरंच भान हरवले आणि त्यांनी मनुस्मृति जाळणे ऐवजी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू बालोद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासमोर कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने जितेंद्र पवार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला , यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा सेल चे जिल्हाध्यक्ष सतपाल बनसोडे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संतोषजी भांडे यांनी तीव्र निषेध व्यक्त करत जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मरून आंदोलन केले यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट चे युवा तालुकाध्यक्ष अमरदादा मडके यांनीही त्यांच्या तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करून जितेंद्र आवड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट महाराष्ट्र युवा प्रदेश सरचिटणीस शंतनुजी खंदारे यांनीही जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध व्यक्त केला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुक्यातील नेते बावनेबापू ,आगतराव कापसे , अमरदादा मडके , शंतनुजी खंदारे, अभिजीतभैय्या हौसलमल ,नितीनजी ठाणअंबिर ,महेश जी गायकवाड ,विक्रमजी चोंदे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब खंडागळे , सतपालजी बनसोडे , संतोषजी भांडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेतेगण यांच्याकडून तीव्र शब्दात जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करत सर्वांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले व त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.....
