Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धर्मरक्षिणी लोकमाता महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

 धर्मरक्षिणी लोकमाता महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 

      
                सा . दै . देशभक्त परिवारकडुन लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी विनम्र अभिवादन ...... !
               
                     जयंतीदिनी अहिल्यादेवीं विशेष 

अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंड़ी येथे ३१ मे १७२५ रोजी झाला तर निर्वाण १३ ऑगस्ट १७९५ रोजी झाले. त्या सुभेदार मल्हारराव होळकरांच्या सुनबाई म्हणजे राजे खंडेराव यांच्या पत्नी होत्या. दिनांक १७ मार्च १७५४ ला कुंभेरीच्या लढाईत राजे खंडेराव यांचा मृत्यू झाला. एक पराक्रमी योद्धा म्हणून खंडेरावांनी त्या काळात मोठा लौकिक मिळवला असला तरी इतिहासकारांनी मात्र त्यांची अकारण बदनामीच केलेली आहे. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हार बाबांनी आपल्या सुनेला म्हणजे माता अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही. एवढेच नाही तर आपल्या विधवा सुनेच्या हाती राज्य कारभार देऊन जगाच्या इतिहासात कुठेच न घडलेले होळकरशाहीत घडवून दाखवले . होळकरशाहीचा कट्टर शत्रू माल्कमने अहिल्यादेवींबद्दल पुढील उद्द्गार काढले आहेत."पेशव्यांपासून ते सनातनी हिंदूपर्यंत सर्वानीच सर्व प्रकारच्या मर्यादा घातलेल्या असतानाही अहिल्याबाईनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजादक्ष प्रशासन केले त्याला जगात तोड़ नाही. केवळ माळव्यातच नव्हे तर जिथे तिची राजवट नव्हती अशा सबंध हिन्दुस्थानातील प्रजा तिला दैवी अवतार मानते,याचे कारण म्हणजे अहिल्याबाईचे प्रजेवरील प्रेम आत्मशुद्धता व विकासाची कायम धडपड होय"*.प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे कि एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. 

माल्कमच नव्हे तर असंख्य युरोपियन इतिहासकारांनी भले येथील राज्यकर्त्यांचे वाभाडे काढले असतील, पण अहिल्यादेवींवर लिहितांना आपल्या आदरभावनेला मुक्तद्वार दिले आहे. डॉ. अनी बेझंट म्हणतात भारत देशाची खरी सुपुत्री म्हणजे अहिल्यदेवी होय, कारण ती नुसती प्रजहितपालक नव्हती तर राष्ट्राचे ऐक्य आणि राष्ट्रभावनेला जतन करत सर्वत्र आपल्या खाजगीतुन समाजकार्य करणारी एकमेव राष्ट्रमाता आहे. ज्यावेळी संपूर्ण जगात स्त्रियांचे पारतंत्र्य होते त्याकाळात मातेने आपले कर्तुत्व सिद्ध केले . पाचशे महिलांची फौज निर्माण केली. महेश्वरला मुलींच्या शिक्षणाची सोय केली. संपूर्ण भारतभर मंदिरे, घाट,अन्नछत्रे निर्माण करून जनतेची सेवा केली. मातेची २८ वर्षाची राजवट म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्याचा भारतव्यापी विस्तार होय. 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त सा . दै . देशभक्त परिवारकडून विनम्र अभिवादन .....! आणि सर्व समाज बांधवांना जयंती निमित्ताने मनपूर्वक हार्दीक शुभेच्छा . !

                                -  संपादक  -

                      लक्ष्मण (तात्या ) शिंदे - पाटील 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.