भूम - परंडा - वाशी तालुक्यातील रुग्णांसाठी डहाणू डेपोची डहाणू - भून एसटी सुरु रुग्णांची होणारी हेळसां थांबली ...
डॉ . घुले यांच्या प्रयत्नाला यश .
देशभक्त न्युज - भूम प्रतिनिधी /
सर्वसामान्यांच्या हितासाठी भूम परंडा वाशी तालुक्यातील आरोग्यापासून त्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत रुग्ण सेवा मिळावी या भावनेतून धाराशिव एस टी महामंडळाकडून भूम बस डेपो मार्फत भूम ते डहाणू अशी बस चालू केली असताना राजकीय अकसापोटी ही बस सेवा बंद करण्यात आली . यात बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा असुन त्यांच्या चालीवर मात करीत "आरोग्य दूत " डॉक्टर राहुल घुले यांनी मंत्रालय येथे पाठपुरावा करून भूम तालुक्यातील तसेच भूम - परंडा - वाशी मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळूनये यासाठी ज्या चाली करून भूम ते डहाणू बस सेवा बंद पाडण्यात आली होती त्याकुरघोडीच्या राजकारणावर मात करीत पुन्हा डहाणू डेपोची डहाणू - भूम , भूम ते डहाणू अशी बस सेवा पूर्ववत चालू झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून डॉक्टर राहुल घुले यांचे आभार आणि कौतुक केले जात आहे .
"सौ सोनार की एक लोहार की" अशा म्हणीप्रमाणे राजकीय लोकांनी केलेल्या चालीवर मात करीत आरोग्य दूत राहुल घुले यांनी सर्वसामान्यांच्या हिताला न्याय देण्याच्या बाजूने पुन्हा डहाणू बस सुरु केली असल्याने राजकारण करणाऱ्यांच्या चारी मुंड्या चित्त झाल्या असल्याची चर्चा मात्र भूम बस स्थानकावर आणि नागरिकांमध्ये चांगल्याच रंगल्या आहेत .
भूम - परंडा - वाशी तालुक्यातील सर्व समाजातील लोकांना मोफत आरोग्य सुविधासह अद्याप पर्यंत जवळपास अडीचशे च्या वर रुग्णांवर ऑपरेशन शस्त्रक्रिया करून त्या लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोच करणारे डॉ. राहुल घुले व त्यांचे बंधू डॉ. अमोल घुले यांच्या या कार्याला अडथळा व्हावा या हेतूने काही राजकीय मंडळींनी मोफत चालू असलेल्या आरोग्य सेवेला खिळ बसावी याच भावनेतून आगार प्रमुख धाराशिव व भूम यांच्या वरती दाबाव आणून डहाणू बस सेवा बंद केल्या बाबत नागरीकातुन बालले जात आहे . यामुळे भूम - परंडा - वाशी तालुक्यातील बहुतांशी लोकांना मोफत आरोग्य सुविधा घेण्यापासून कांही काळ मुकावे लागले तर काही नागरिकांना स्वतःच्या खर्चातून सौ . कमल घुले फाउंडेशन यांच्याकडून मोफत आरोग्य सेवा देण्यात आल्याचे रुग्णांतुन बोलले जाते . तर भूम - परंडा - वाशी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ लागली आहे ही झळ कोणी लावली हे सांगण्याचे उचित नाही असे सांगत डॉक्टर राहुल घुले यांनी पुन्हा आपन चालू केलेल्या या भूम ते डहाणू बसचा लाभ भूम तालुक्यातील पेढा वितरक उत्पादक त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी आणि आरोग्य च्या दृष्टीने ज्यांना गरज आहे अशा सर्व लोकांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आमच्या या आरोग्य उपक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आव्हान केले आहे . भूम बस स्थानकात भूम ते डहाणू पूर्वरत सुरु करण्यात आलेल्य बस ची पूजा करून पुढील प्रवासासाठी बसगाडी मार्गस्थ केली याप्रसंगी बसचे चालक , वाहक यांचा सत्कार करून त्यांना आरोग्य किट डॉक्टर घुले यांच्यामार्फत देण्यात आले.
याप्रसंगी सौ .कमल घुले फाउंडेशनचे व्यवस्थापक सचिन जाधवर, रफिक पिरजादे, वसीम काजळेकर धनंजय शेटे, अजित बागडे, आशिष बाबर, आरोग्य टीम उपस्थित होते.
डहाणू ते भूम डहाणू डेपो ची गाडी चालू केल्याने भूम डेपोला अधिक उत्पन्न मिळवून देणारी बस राजकीय लोकांनी बंद केले असल्याने भूम डेपो आर्थिक उत्पादनाला मुकला.
भूम ते डहाणू बस चालू झाली असल्याने डॉक्टर राहुल घुले यांचे व त्यांच्या फाउंडेशन चे आभार व्यक्त करीत बस बंद करण्यासारखे घाणेरडे राजकारण करणार्यांनी किमान आरोग्याला ग्रासलेल्या लोकांचा तरी विचार करावा असा टोला लगावत नागरिकांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.
-: आरोग्य सेविका सौ .काळे :-
डहाणू डेपोच्या आर्थिक उत्पन्नात निश्चितपणाने भर पडणार.
आता डहाणू डेपोवर सुद्धा राजकीय मंडळी दबाव आणणार का ? असा सर्व सामान्या समोर प्रश्न .
भूम तालुक्यातील खवा व पेढा उत्पादक व वितरण यांना सोयीचं वाहन उपलब्ध झाले.
सौ .कमल घुले फाउंडेशनच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या नागरिकांना सोयीचा मार्ग सुरू झाला.
डॉ. राहुल घुले यांचे नागरिकांनी केले मनापासून आभार व्यक्त .

