मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सातलिंग स्वामी यांच्या कडुन सत्कार
देशभक्त - न्युज उमरगा - प्रतिनिधी / -
मराठा योद्धा मनोज जरांगे - पाटील यांची आंतरवली सराटी येथे उमरगा जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी असलेले व उमरगा लोहारा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकलेले सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शाल व तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन विविध विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली .
याप्रसंगी सातलिंग स्वामी यांच्यासह तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणारे संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवश्री शरद पवार, संभाजी ब्रिगेडचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष शिवश्री महादेव मगर, संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुकाध्यक्ष शिवश्री अण्णासाहेब पवार, विरशैव सभा धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन वाले आदी मान्यवर उपस्थित होते.

