लंडन येथील ग्लोबल परिषदेत डॉ . संदिप तांबारेचा शोध प्रबंध सादर
"व्यसनांचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम " हा प्रबंध सादर करून डॉ . तांबारेच्या कर्तृत्वाचा लडनमध्ये झेंडा
देशभक्त न्युज - धाराशिव - प्रतिनिधी / -
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२३ मध्ये लंडन स्कूल इन इकोनॉमिक या संस्थेस डी . एस . सी . पदवी " द प्रॉब्लेम ऑफ रूपी इटस ओरिजन ॲन्ड इटस सोल्युशन " हा प्रबंध सादर केला होता या घटनेला २०२४ ला १०० वर्ष पूर्ण झाली . डॉ . बाबासाहेबांनी केवल पदवी मिळावी म्हणून हा प्रबंध सादर केला नव्हता तर भारतीय रुपयाचे अवमूल्यन ब्रिटिश सरकार करत असुन देशाचे शोषण सरकार करीत आहे हे त्यांनी ब्रिटिश अहवालाच्या अधारे सिद्ध केले होते . त्यामुळे या ग्रंथाची दखल अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश सरकार यांनी घेतली होती . १९२५ ला देशात एडवर्ड यंग यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळी समिती नेमून अभ्यास करण्यात आला होता . त्यांनी सुचविलेल्या मतांच्या अधारे पुढे १९३५ साली आर्थिक नियंत्रणाखाली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली होती .
आर्थिक लेखाजोखा मांडण्यासाठी भारतातील आणि जगातील विद्वानांनी या परिषदेत घेतला सहभाग -
या प्रबंधातील मते आजही भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यास उपयुक्त असल्याचे जानून या प्रबंधास १०० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून डॉ . बाबासाहेबांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारताच्या आर्थिक वाटचालीचा लेखा जोखा करन ती सुधारण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी दि . ११ जून २०२४ रोजी लंडन येथील ग्रेज इन या संस्थेत ग्लोबल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . या परिषदेत भारतातील आणि जगातील विविध विद्वानांनी सहभाग घेतला होता .
डॉ . तांबारे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदण आणि कौतुक -
धाराशिव जिल्हातील कळंब तालुक्यामधील आंदोरा गावचे रहिवाशी असलेले डॉ . संदिप तांबारे यांनी येरमाळा येथे येडाई व्यसनमुक्ती केद्राच्या माध्यमातुन सामाजिक कार्याचा हाती वसा घेवून व्यसन मुक्तीवर कामकाज सुरु केले . या त्याच्या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र पातळीवर , देशपातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेवून सामाजिक न्याय्य विभाग व शाससन स्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे .
डॉ . तांबारे यांनी बार्शी तालुक्यातील जामगावाजवळ कळंब - बार्शी रस्त्याच्या कडेला व्यसनमुक्ती साठी भव्य मोठे रिचर्स सेंटर उभारले असुन येथून व येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्रातुन असंख्य लोक त्यांच्या उपचार पद्धतीने व्यसन मुक्त होत आहेत .
सामाजिक कार्याच वसा हती घेतलेल्या डॉ . संदिप तांबारे यांनी लंडन येथील ग्लोबल परिषदेला स्वखर्चाने जावून
" व्यसनांचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम " हा शोध प्रबंध सादर केला आहे . यामुळे येथील राजकीय , सामाजिक , सर्वसामान्य वर्गातुन त्यांचे मोठे कौतुक होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .



