मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेपासुन कोणतीही बहीण वंचित राहु नये यासाठी ईटकुरातील अंगणवाडी सेविका , मदतनीस लागल्या कामाला
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिकांच्या बैठकीतील सूचना नुसार अंगणवाडी सेविका , मदतनिस यांच्या टीम डोअर टु डेअर .
देशभक्त न्युज - ईटकूर - प्रतिनिधी / -
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा असुन या योजने अंतर्गत पात्र महिलांना महिना १५०० / हजार रुपयांची मदत महाराष्ट्र सरकारने जाहिर केली असुन महिला भगिनींची हेळसांड होवू नये , कागदपत्र , ऑनलाईन आदि संदर्भात त्यांची आर्थिक पिळवणूक होवू नये यासाठी तहसिल विभाग , म्हसुल विभाग , एकात्मिक बालविकास योजना , ग्रामपंचायत , मान्यताप्राप्त ऑनलाईन केंद्र यांना सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत .
त्याचीच अंगल बजावणी म्हणून कळंब तालुक्यातील ईटकूर येथे कार्यरत असणाऱ्या ८ अंगणवाडयाच्या अंगणवाडी सेविका , मदतनीस यांची बैठक एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वैशाली सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यात विभागवार घेण्यात येत असुन ईटकूर विभागाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती सावंत यांच्या उपस्थितीमध्ये दि . ४ जुनला संपन्न झाली . यात श्रीमती सावंत यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्र , त्यासाठी लागणारा मोफत देण्यात येणारा फॉर्म , हमीपत्र भरून घेणे , कोणीही योजने पासुन वंचित राहु नये याबाबत घ्यावयाची काळजी याच्या सूचना दिल्या .
वरिष्टांच्या सुचनांची तात्काळ अंमल बजावणी करीत भिमनगर येथील अंगणवाडी क्रमांक - ४०१ च्या अंगणवाडी सेविका श्रीमती उषा ओव्हाळ यांनी घरोघर जावून लाभधारक महिलांत राबविण्यात येत असलेल्या या योजनेबाबत जनजागृती करीत प्रत्यक्ष आपल्या कार्यक्षेत्रात डोअर टु डोअर कामकाज सुरु केले आहे . त्यास महिलांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .


