Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छ.शिवाजी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न

 

मेळाव्याची सुरुवात छ.शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै. नरसिंग(आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. 

छ.शिवाजी महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

देशभक्त -  न्युज - कळंब  प्रतिनिधी / -

येथील छ.शिवाजी महाविद्यालयात  विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा घेण्यात आला. विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा,विद्यार्थ्यांची प्रगती समजावी तसेच विद्यार्थी व पालक यांच्या अडीअडचणी  कशा प्रकारे दूर होतील या उद्देशाने या मेळाव्याचे महाविद्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याची सुरुवात छ.शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै. नरसिंग(आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.  कार्यक्रमाचे उदघाटक संस्थेचे सचिव शिवाजी(आप्पा) कापसे, सहसचिव प्रा.संजय घुले, उत्रेश्वर (नाना) पाटील, देशभक्त चे संपादक  लक्ष्मण ( तात्या ) शिंदे - पाटील ,  रविकांत आडसूळ, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहिर बंडू खराटे , पिंक पथकचे पोलीस कॉन्स्टेबल वैद्यनाथ मोहिते , प्राचार्य.शशिकांत जाधवर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून देशभक्त चे संपादक लक्ष्मण ( तात्या ) शिंदे - पाटील  यांनी पालक , पाल्य आणि महाविद्यालय या त्रिसुत्री समन्वयातुन विद्यार्थी कशाप्रकारे घडला जावा याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. 

तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातुन पालक व विद्यार्थी यांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले. यावेळी पिंक पथकचे पोलीस कॉन्सटेबल वैद्यनाथ मोहिते यानी पिंक पथका संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शशिकांत जाधवर व प्रास्ताविक डॉ.हनुमंत माने यानी केले. सुत्रसंचालन प्रा.राजाभाऊ चोरघडे यानी केले व आभार डॉ.अनंत नरवडे यानी मानले. यावेळी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.