पंढरपूर-खामगाव महामार्गावरील कन्हेरवाडी पाटीवर अपघात व मृत्युला सदैव आमंत्रण देणाऱ्या अशा अर्धवट राहिलेल्या रस्त्याचा वनवास अखेर संपणार ..... !
कर्तव्यतत्पर पोनि . रवि सानप यांच्या पोलिस टिमच्या बंदोबस्तात कामास सुरुवात .
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
कळंब ते येरमाळा राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरवाडी पाटी जवळ अंदाजे 700 ते 800 मीटर रस्त्याचे काम काही कारणास्तव रखडलेला होता या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या ठिकाणी दररोज अपघात होतात या अपघातामुळे अनेक कुटुंबातील कर्त्या माणसाला जीव गमवावा लागला तर काहिजणांना कायमचे अपंगत्व आले होते आता राहिलेल्या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पोलीस यंत्रणेसह पोलीस बंदोबस्तात मेघा कंपनी कामाला लागली आहे रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी मेघा कंपनीने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती या मागणीला पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस निरीक्षक रवि सानप,पोलीस उपनिरीक्षक हणुमंत कांबळे,पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे,पोलीस उपनिरीक्षक श्रीराम बहुरे,महिला पोलिस अंमलदार व इतर पोलिस कर्मचारी मोठा फौजफटा घेऊन रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अर्धवट रस्ता पूर्ण करण्यासाठी दिवसभर थांबुन होते या राष्ट्रीय महामार्गाचे 2016 ते20 17 मध्ये हे काम हाती घेण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शंभर फूट रस्ता असलेली नोंद असून हा मार्ग रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केल्यानंतर जेवढे हस्तांतर झाले तेवढ्या जागेवर हा रस्ता करण्यात आला होता परंतु कन्हेरवाडी पाटीवर पारधी समाजातील काही लोकांकडून या रस्त्याचे काम अडवण्यात आले होते या अर्धवट रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी,रस्ते विकास महामंडळ अधिकारी आणि रस्ता आडवणाऱ्या मध्ये नुकतीच बैठक झाली होती त्यामुळे रखडलेल्या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली तेव्हा काही पारधी समाजाचे लोक व महिला जेसीबी समोर आडवे येवून त्यांनी काम अडवण्याचा प्रयत्न केला असता कळंब पोलिस निरीक्षक रवि सानप व त्यांच्या पुर्ण स्टाफने या पारधी समाजाच्या लोकांना समजावून सांगितले व पोलीस यंत्रणा तळ ठोकुन या ठिकाणी बसले होते.तसेच या रस्त्याचे काम एका बाजूने पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या बाजूला रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे त्यामुळे त्या ठिकाणी मातीचे ढिगारे टाकण्यात आल्यामुळे रात्री अपरात्री या ठिकाणावरून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता आदल्या दिवशीच गुरवारी संध्याकाळी कन्हेरवाडी येथील दोन युवकांचा अपघात झाला आहे ते कळंब येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत या रस्त्याचे काम चालू केल्यामुळे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस निरीक्षक रवि सानप व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रवाशासह नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.
पोलिसांची आंदोरा , कन्हेरवाडी , मस्सा येथील नागरिक , प्रवाशी क वहान चालक मालक यांच्याकडुन सहकार्याची अपेक्षा .....
पोलिस निरीक्षक रवि सानप यांनी हा रस्ता पुर्ण होईपर्यंत पोलिस संरक्षण देणार आहे तरी आंदोरा,कन्हेरवाडी,मस्सा व इतर गावातील नागरिकांनी आणि वाहन चालक मालकांनी पोलीस कर्मचारी यांना सहकार्य करावे असे सांगितले.

