सोलापूर - जिंतूर बसचे टायर फुटल्याने कळंब - येरमाळा रस्त्यावरील डिव्हाडरवर बसगेल्याने मोठा अपघात टळला
बसचे टायर फुटल्याने व रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा असल्याने चालकाने प्रसंगवधान साधुन बस डिव्हायडरकडे वळविल्याने बस डिव्हाडर तोडीत पुढे यात बसचे मोठे नुकसान .
खचाखच भरलेल्या बस मधील प्रवाशी बालंबाल बचावले मात्र कांही प्रवाशी किरकोळ जखमी जिवितहानी टळली . गावकरी व रस्त्यावरील प्रवाशी धावले मदतीला .देशभक्त न्युज - सुरेश कांबळे दहिफळ यांजकडून
कळंब - येरमाळा रस्त्यावर परतापूर येथे आज सकाळी ११ च्या दरम्यान सोलापूर - जिंतूर बस क्रमांक MH - 14 BT 2248 या बसचे टायर फुटल्याने भरधाव वेगाची बस ही डिव्हायडरवरील गार्डतोडीत पुढे गेल्याने या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गाडीतील प्रवाशी मात्र या अपघातातून बालंबाल बचावले . सदरील गाडीला झालेल्या अपघातामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले असुन कांही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत . सुदैवाने जिवीतहानी झाली नाही . गावातील व रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीच्या बाहेर काढले . सदर रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा असल्याने जिवावर आले ते डिव्हायडरवर गेले अशी चर्चा प्रवाशी व नागरीकांतुन यावेळी होती .


