मुख्यमंत्री यांच्या अश्वासनानंतर धनगर बांधवांचे उपोषण सुरजमहाराज साळुंखे यांच्या मध्यस्थिने मागे
शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या पुढाकारातुन ६ व्या दिवशी अखेर उपोषण कर्त्यांचे उपोषण स्थगित .
देशभक्त - न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
सकल धनगर समाज धाराशिव यांच्या वतीने धनगर' जातीला अनुसूचित जमातीचे (S.T) प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणी साठी दिनांक १५ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु होते . उपोषण कर्त्यांच्या तब्येत खालावत चालल्याने उपोषणाच्या ६ व्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज महाराज साळुंखे यांनी उपोषण स्थळी भेट देवून त्यांच्याशी उपोषण मागे घेण्याबाबत चर्चा करून उपोषण कर्त्यांचा महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद घडवून आणला असता त्यांना मुख्यमंत्री यांनी आपले शिष्टमंडळ भेटीस या आपण चर्चा करू तुमच्या प्रश्नावर मार्ग काढु असे अश्वासन दिल्याने हे अंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले .
महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (S.T.) प्रमाणपत्र देण्यात यावे, या न्याय मागणीसाठी अनेक दशकापासून वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने आंदोलने चालू आहेत. त्याचाच भाग महणून धाराशिव जिल्ह्यात सुद्धा अनेक वेळा मोर्चे, उपोषण झाले. तरी त्याची शासन कसलीही दखल घेत नाही. यामुळे धनगर समाजात आक्रोश आहे. शासनाने योग्य भूमिका घ्यावी यासाठी व धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे या मागण्यासाठी येथील समाज बांधवाच्या उपस्थित हे उपोषण करण्यात आले .
प्रशासनास निवेदनाद्वारे इशारा देवून उपोषण कर्ते शामसुंदर श्रीकांत तेरकर गावसुद , कमलाकर राजेंद्र दाणे -बेंबळी , राजू गौतम मैंदाड चोराखळी , समाधान युवराज पडळकर- येवती हे १५ जुलै पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते .

