लोजपा व रिपाई यांच्या वतीने भारत बंदला पाठिंबा कळंब उपविभागिय अधिकारी यांना दिले निवेदन
देशभक्त न्युज - कळंब । प्रतिनिधी / -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती, जमातीला सामाजिक आधारावर घटनात्मक आरक्षण दिले आहे या याबाबतीत सर्वोच्च न्यायालय यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे. व एस सी, एसटीला क्रिमीलेअरची अट लागू करण्यात यावी असा निकाल दिला आहे हा निकाल घटनाबाह्य असून एससी, एसटीचे, आरक्षण संपवण्याचे कटकारस्थान आहे. म्हणून दि 21/08/2024 रोजी संपूर्ण दलित, आदिवासी, ओबीसी, समाजाच्या सामाजिक, राजकीय, संघटनांनी, भारत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता . सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करून अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणामध्ये छेडछाड करण्यात येऊ नये. यासाठी संसदेत कायदा करण्यात यावा. यासाठी भारत बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) व लोकजन शक्ती पार्टी, जिल्हा शाखा धाराशिव च्या वतीने पाठिंबा देण्यात येत असल्याचे निवेदन कळंब उपविभागिय अधिकारी यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनावर लोजपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड , रिपाई खरात गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष महाविर गायकवाड , नागेश धिरे , सुरेश कांबळे , जावेद शेख , बालाजी वाघमारे , भारत कदम , निवृत्ती हौसलमल , ज्ञानदेव हौसलमल , अरुण कांबळे , बाबासाहेब ओव्हाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
