ईटकूर प्रशालेचे क्रीडा स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर यश जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
कळंब येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जि. प. प्रशाला ईटकूर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करून जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटातील अनन्या दत्तात्रय आडसूळ तर 17 वर्षे वयोगटातील अभिजीत बाबासाहेब आडसूळ या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली. 17 वर्षे वयोगटातील कुस्ती स्पर्धेमध्ये अक्षरा अशोक गाडे या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला असून तिची देखील जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर 14 वर्षे वयोगटातील व 17 वर्षे वयोगटातील कबड्डी या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अजिंक्य राहून तालुकास्तरावर प्रथम मिळवला आहे. 14 वर्षे वयोगटातील कबड्डी संघामध्ये मल्हार सचिन गवारे, कार्तिक रविकांत गंभीरे, सुगत विकास शिंदे, सुबोध गौतम शिंदे, ऋतुराज मधुकर आडसूळ, युवराज अमर पोते, ओम रामकिसन माने, कृष्णा अमोल पोते, ओमराजे संतोष थोरात, आदर्श लिंबराज जाधव, प्रविण संतोष फरताडे, सार्थक हनुमंत माने या खेळाडूंचा समावेश आहे तर 17 वर्षे वयोगटातील कबड्डी संघामध्ये शंकर अंगद आडसूळ, श्रेयश सतीश बावळे, शिवम बिभीषण शेंडगे, संकेत श्रीधर बावळे, रोहित संजय पांढरे, कृष्णा बाळासाहेब एकशिंगे, स्वराज समाधान फरताडे, आर्यन बालाजी बावळे, प्रशांत पांडुरंग गंभीरे, ओंकार विलास आडसूळ, पृथ्वीराज उमेश आडसूळ या खेळाडूंचा समावेश आहे.
या दोन्ही संघांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा निदेशक अशोक पसारे, गणेश कोठावळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते, विस्तार अधिकारी सुशील फुलारी, केंद्रप्रमुख पांडुरंग गामोड, मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती, ईटकूर ग्रामस्थ अशा सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
