" मुख्यमंत्री लाडकी बहीण " योजनेचे रक्कम खात्यावर जमा
महिलामध्ये आनंदाचे वातावरण
देशभक्त न्युज - नळदुर्ग प्रतिनिधी / -
राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना"या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक महिलांनी याबद्दल महायुती सरकारचे आभार मानले आहे.
राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्यातील महायुतीच्या सरकारने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण "योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा एक चांगला आणि क्रांतिकारी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यावर दि. 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3 हजार रुपये जमा होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते मात्र 17 ऑगस्ट पुर्वीच दि. 15 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक महिलांच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा झाले आहेत. तुळजापुर तालुक्यासह नळदुर्ग शहरातील अनेक महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये जमा झाले आहेत. थेट महिलांच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा झाल्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र ज्या महिलांच्या खात्यावर अद्याप हे पैसे जमा झाले नाहीत त्यांची मात्र आमच्या खात्यावर पैसे का जमा झाले नाहीत याची विचारपुस करण्यासाठी पळापळ सुरु होती मात्र येत्या 19 ऑगस्ट पर्यंत या योजनेतील सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.
राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी एक चांगली आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी योजना जाहीर करून हे सरकार थांबले नाही तर बोलल्या प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी दिलेल्या तारखेच्या आत या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यावर दोन महिन्याचे 3 हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे महिलांनी महायुती सरकारचे आभार मानले आहे.
या योजनेमुळे खऱ्या अर्थाने सामान्य महिला आज आर्थिक या या दृष्ट्या सक्षम होणार आहेत. कारण या योजनेतील पैसे थेट महिलांच्या बँक खात्यावर जमा होत आहेत. त्यामुळे या योजनेचे महिलांनी स्वागत केले आहे.
