धाराशिव जिल्हा बीएसपी प्रभारीपदी संजयकुमार वाघमारे तर जिल्हाध्यक्षपदी डॉ . शिवाजी ओमन यांची निवड
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
बहुजन समाज पार्टीची धाराशिव येथील पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ॲड . सुनील डोंगरे यांच्या आदेशान्वये व राज्य कार्यकारणी सदस्य विलास शेरखाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धाराशिव जिल्हा युनिट यांची नुकतीच या ठिकाणी जिल्हा कमिटीची बैठक संपन्न झाली यात यावेळी सर्वानुमते जिल्हा कमिटी तयार करण्यात आली झालेल्या निवडीमध्ये जिल्हा प्रभारी म्हणून संजयकुमार वाघमारे , दुसरे प्रभारी गणेश गोरे , जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव ओमन , जिल्हा उपाध्यक्ष महादेव लोखंडे , जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून प्रवीण जगताप तर जिल्हा महासचिव सादिक पठाण , कार्यालयीन सचिव लहूराज खुणे , कोषाध्यक्ष सुभाष गायकवाड , बामसेफ संयोजक गंगावणे , बीव्हीएफ स्वाती ताई लहूराज खूने - शिरसाट , जिल्हा सचिव बीएस विद्याघर इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या नियुकत्या करण्यात आल्या यावेळी धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून पक्षाची बांधणी व पक्षवाढीसाठी सदैव कार्य करीत असलेले संजय कुमार वाघमारे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थित होती. या जाहिर झालेल्या निवडीनंतर आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव सादिक पठाण यांनी मानले.
