मराठा आरक्षणाचा वापर कुणालाही या महाराष्ट्रात करू देणार नाही आसा छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे - पाटील यांनी तुळजापूर येथील मराठा जागर सभेत इशारा दिला .
देशभक्त न्युज - तुळजापूर । प्रतिनिधी
अखिल भारतीय छावा मराठ युवा संघटनेची मराठा आरक्षण जागर सभा तुळजाभवानी प्रवेशद्वारासमोर संपन्न झाली.
आई तुळजाभवानीचे दर्शन आपले सहकारी यांच्यासोबत घेऊन तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वार समोर या सभेला सुरुवात करण्यात आली. या सभेला संबोधित करताना छावा संघटना प्रमुख नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणीचा पाढाच आजच्या सभेतुन राज्य शासनाकडे वाचून दाखवला पुढे बोलताना नानासाहेब म्हणाले गेली 42 वर्ष मराठा आरक्षणाची महाराष्ट्रात लढली जात आहे . त्या मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी अण्णासाहेब जावळे पाटलांचे योगदान त्यांनी निर्माण केलेली छावा संघटना यांनी आज पर्यंत किती कार्य केले हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे .अनेक राजकीय पक्ष्यांचे मुख्यमंत्री होऊन गेले परंतु त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले नाही. 18 नोव्हेंबर 2018 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना 13 टक्के आरक्षण दिले परंतु महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होऊन त्यात मराठा आरक्षण लढाई कोर्टात गेली तेही आरक्षण टिकले नाही, राज्य शासनाने दहा टक्के एसईबीसी आरक्षण दिले त्यात शासनाच्या सर्व नोकरभरत्या काढल्या त्यात मराठा समाजाच्या नोकर भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदपत्रासाठी अडचणी येत आहेत, मराठ्यांचं ईडब्लूएस हे ही आरक्षणात भेटणे बंद झाले. एसईबीसी दहा टक्के आरक्षण राज्य शासनाने दिले ते कुठे आणि कसे लागू आहे ते आम्हाला सांगावे पुढे बोलताना नानासाहेब म्हणाले मराठवाड्यात कुठलाच विकास झाला नाही त्यामुळे प्रामुख्याने मराठा समाज सर्व जातीला घेऊन चालणारा मराठा समाज मागास झाला आहे त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांसाठी अण्णासाहेब जावळे पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे त्या महामंडळावर 1000 कोटीची तरतूद करण्यात यावी हे झाले तर मागास ठरलेल्या मराठवाड्यात उद्योगांना चालणा मिळेल व मराठ्यांचे जे काय मागास पण राहिलेले आहे ते दूर होईल. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी सरसगट करण्यात यावी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लाईट बिलही सरसकट माफ करण्यात यावे . महाराष्ट्रात मराठ्यांच्या मतावर राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये अन्यथा छावा संघटना शांत बसणार नाही, झेंड्याचे दांडे काढून जे मराठा समाजाच्या मतावर राजकारण करू पाहतात त्या राजकीय लोकांच्या पाठीवर हल्ले करण्यात येतील.मराठ्यांच्या मताचा वापर फक्त राजकारणासाठी होत गेला. मराठा आरक्षण हा प्रश्न आज ही तसेच ज्वलंत आहेत त्यामुळे सर्व राजकीय पक्षातील राजकीय आमदारानी आपली भूमिका स्पष्ट करावी की नेमके मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्यावे की अजून कुठल्या प्रवर्गातून आणखीन कशातून आरक्षण देण्यात यावे हे स्पष्ट करून महाराष्ट्र राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि मराठ्याची जी होत असलेली फरपट थांबवावी. अन्यथा छावा राजकीय पुढार्यांना ठोकून काढण्याचे काम करेल.
छावा संघटना आजपर्यंत कधीच राजकारणात आमदारकी, खासदारकीसाठी लढली नाही फक्त मराठा समाजासाठी लढत राहिली याच्यापुढेही लढत राहणार कारण छावा संघटनेची निर्मितीच मराठ्यांच्या हितासाठी झाली आहे . अण्णासाहेब जावळे पाटलांनी समाजातील अठरापगड 12 बोलतेदार यांना सोबत घेऊन कार्य केलेले आहे. त्यामुळे जिथे अन्याय तिथे छावा संघटना नेहमी काम करत राहील असे उद्गार नानासाहेब जावळे पाटलांनी काढले. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांनी भाषणे केली.
या सभेला हजारोंच्या संख्येने धाराशिव जिल्ह्यातील छावे उपस्थित होते. तर सभेला प्रमुख उपस्थिती छावा संघटना प्रमुख नानासाहेब जावळे पाटील,संघटना केंद्रीय कार्यअध्यक्ष भीमराव भाऊ मराठे, प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, नांदेड जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे पाटील, जालना जिल्हाध्यक्ष राधेश्याम पोवळ , इतरही जिल्ह्यातील मुख्यपदाधिकारी तसेच धाराशिव युवक अध्यक्ष बाळासाहेब माने, धाराशिव , तुळजापूर तालुकाध्यक्ष रवी साळुंके, तुळजापूर शहराध्यक्ष अण्णासाहेब इंगळे ,तालुकाध्यक्ष रोहित पाटील, कळंब तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव, वाहतूक आघाडी शिवहरी भोसले, बालाजी जावळे, बंजारा आघाडी जिल्हाध्यक्ष , धाराशिव जिल्ह्यातील इतर पदाधिकारी, हजारे संख्येने जनलोक, पत्रकार बांधव उपस्थित होते.



