बिभीषण कुंभार या सुशिक्षित बेकाराने निवेदनाद्वारे केली मागणी
देशभक्त न्युज - ईटकूर । प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील ईटकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर देशी दारू , आणि हातभट्टी दारू विक्री करून वैयक्तीक अर्थिक प्रगती साधण्यासाठी गावातीलच सुशिक्षित बेकार बिभीषण कुंभार या चुकाने चक्क जिल्हाधिकारी , पोलिस , तहसिल , पंचायत समिती , ग्रामपंचायत कडे नाहरकत देण्याची दि . ३१ जुलै २०२४ रोजी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
दिलेल्या निवेदनात कुंभार यांनी असेही म्हटले आहे की , १५ ते १६ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील जिप. प्रशाला व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सध्या राजरोसपणे खुले आम सुरु असलेली देशी दारू , हातभट्टी दुकाने बंद करावीत अन्यथा मला नविन देशी दारू व हातभट्टी दारु दुकान सुरु करण्यासाठी कायदेशिर नाहरकत देवून परवानगी द्यावी .
जिल्हाधिकारी धाराशिव , उपविभागिय अधिकारी , पोलिस उपविभागिय अधिकारी , तहसिलदार , गटविकास अधिकारी पंचायत समिती , पोलिस स्टेशन कळंब , ग्रामपंचायत कार्यालय या गंभीर प्रकरणी दिलेल्या निवेदनावर काय कार्यवाही करणार याबाबत नागरीकांचे लक्ष लागले आहे .
दारुड्या तळीरामांच्या आपआपसातील शिवराळ शिव्या ,आर्वाच्च भाषा यांचा मात्र या मुख्य रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या महिला , पुरुष , नागरिक , शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो .
अवैध विनापरवाना सुरु असलेली देशी दारूची व हात भट्टीची दुकाने कायम स्वरूपी बंद करण्याचीही कुंभार यांची मागणी .
बीट मधील पोलिस मात्र या राजरोसपणे चालणाऱ्या अवैध धंद्यावर थातूर मातूर कारवाई करतात आणि पुन्हा जैसे थे , पोलिसांचीही तो मी नव्हेच च्या भूमिकेचा गावकऱ्यांना प्रत्यय .


