गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी यामागणीसाठी नळदुर्ग येर्थ हिंदु संघटनेचा पोलीस स्टेशनवर मोर्चा
देशभक्त न्युज - नळदुर्ग । सुहास येडगे
गोहत्त्या करणाऱ्या व गोहत्त्या करतानाचा व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्या धर्मांधावर कठोर कारवाई करावी, तसेच गोहत्त्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी नळदुर्ग येथे दि. 10 ऑगस्ट रोजी समस्त हिंदु संघटना धाराशिव जिल्ह्याच्या वतीने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढुन या मागणीचे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले. या मोर्चामध्ये नळदुर्ग, तुळजापुर, धाराशिवसह ग्रामिण भागातील जवळपास 2 हजार युवक डोक्यावर भगवी टोपी घालुन सहभागी झाले होते.
हा मोर्चा नळदुर्ग शहरातील अंबाबाई मंदिरापासुन काढण्यात आला. अंबाबाई मंदिरापासुन निघालेला मोर्चा,नाणीमाँ दर्गाह,माऊली नगर,बसस्टॅण्ड,लोकमान्य वाचनालय, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शास्त्री चौक, भवानी चौक, महात्मा बसवेश्वर महाराज चौक, चावडी चौक, क्रांती चौक मार्गे पोलिस ठाणा असे काढण्यात आला.जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, हिंदु धर्माचा विजय असो अशा घोषणा देत निघालेला हा मोर्चा अतिशय शांततेत व शिस्तीमध्ये निघाला.
मोर्चा पोलिस ठाण्यावर आल्यानंतर मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन हिंदु बांधवानी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये गोहत्त्या बंदी कायदा लागु असताना नळदुर्ग शहरात पवित्र श्रावण मासामध्ये गोहत्त्या करून त्याचा व्हिडीओ प्रसारीत केल्यामुळे समस्त हिंदु बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदरील घटना ही अत्यंत संतापजनक व खेदजनक आहे. या घटनेमुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी गोहत्त्या घडत असल्याची तक्रार यापुर्वी अनेकांनी करून देखील पोलिस प्रशासन अपेक्षित कारवाई करत नसल्याने यातुन कायदा व सुव्यवस्था याबद्दल प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे तात्काळ नळदुर्ग शहरातील सर्व भागात तपास करून त्वरीत गोहत्त्या थांबवावी. तसेच गोहत्त्या केलेल्या व्हिडीओ मधील आरोपीना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गोहत्त्या बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. व गोहत्त्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अन्यथा संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निघालेल्या मोर्चामध्ये नळदुर्ग शहरासह तुळजापुर, धाराशिव, अणदुर यासह ग्रामिण भागातील हिंदु बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.


