शेतकऱ्यांनो तुमचा रूपायाही बुडू देणार नाही म्हणत शेतकऱ्यांच्या निवेदनावर उमरगा - लोहारा विधानसभा उमेदवार - सातलिंग स्वामी यांचा एल्गार
तर वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा-अण्णासाहेब पवार यांचा सज्जड इशारा
देशभक्त न्युज - धाराशिव । प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील पार्वती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी मध्ये भरलेले पैसे परत भेटत नसल्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आमच्या ठेवी आम्हाला परत मिळवून देण्यात यावे याबाबत उमरगा लोहारा विधानसभा उमेदवार तथा बच्चू कडू यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांना होळी येथील शेतकऱ्यांनी दि 11 रोजी निवेदन दिले आहे. लोहारा ग्रामस्थ्यांच्या व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सातलिंग स्वामी आणि संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार हे लोहारा तालुका दौऱ्यावर होते.
सातलिंग स्वामी यांच्यामार्फत माजी मंत्री तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही राहणार मौजे-होळी ता.लोहारा येथील रहिवाशी असुन पार्वती मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालय पुणे शाखा सास्तूर येथे आमच्या अनामत ठेवी, बचत, पिग्मी तसेच अनेक प्रकारच्या आर्थिक प्रकरणातुन आमचे पेसे सदरील बँकेत जमा आहेत, परंतु आमच्या आर्थिक अडचणीच्या काळात म्हणजेच शेतीमशागत, पेरणी, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, शाळेची व शिकवणीची फिस आशा आत्यावश्यक कामांसाठी आमचे हक्काचे बँकेत ठेवलेले पैसे आम्हाला दिले जात नाहीत, त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास होत आहे.याबाबत आंदोलनही करण्यात आली आहेत असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.
बँकेचे संचालक व अधिकारी कर्मचारी वारंवार फंसवत आहेत असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.फोन लावला तर आरेरावीची भाषा वापरतात असाही उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनो तुमच्या कष्टाच्या पैश्याला धक्का लागणार नाही, रुपायाही बुडणार नाही, याबाबत बच्चू भाऊ यांची भेट घेऊन पाठपुरावा करून तुम्हाला न्याय मिळवून देतो असे आश्वासन सातलिंग स्वामी यांनी सर्व पिडीत शेतकऱ्यांना दिले. दरम्यान संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी या पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार असे म्हणाले.
या निवेदनावर शेतकरी संजय मनाळे आणि विष्णू जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
