गणेश मंडळांनो खबरदार डिजे संदर्भात आता आपली मनमानी कराल तर आपणावर कोर्टात केस आणि आरटीओ कडून मोठा दंड अशा दोन्ही कारवाई होणार
कळंब शहरासह ग्रामीण भागातील सर्व गणेश मंडळानी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे अवाहन कळंब पोस्टेचे पोनि . रवी सानप यांनी केले आहे .
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
कळंब शहर व ग्रामीण भागातील जनतेकडून तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या जयंत्या , उत्सव मोठया उत्साहाने साजरे केले जातात पण काळाच्या ओघात काही लोक मोठमोठे डीजे लावून चुकीच्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करत असल्यामुळे गणेश उत्सव सारख्या पवित्र उत्सवाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. असा सर्वत्र समज वाढत चालला आहे. त्यामुळे खऱ्या गणेश भक्ताच्या भावना दुखावत आहेत. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक लोक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मरण पावले आहेत. व बरेच कर्णबधिर झाले आहेत. त्यामुळे कळम शरीरातील ज्येष्ठ नागरिक व पोलीस स्टेशनच्या वतीने येथील हद्दीमध्ये गणेश उत्सव डीजे मुक्त करावा व त्याचे पावित्र्य राखण्यात यावे म्हणून पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश मंडळांना व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. गणेश मंडळांनी वेगवेगळे सांस्कृतिक, शैक्षणिक,व सामाजिक नाविन्यपूर्ण देखावे,उपक्रम राबवून गणेश उत्सवाचे माध्यमातून जनजागृती करुन हा गणेश उत्सव आनंदाने व सामाजिक देखावे सादर करून साजरे करावेत .
गणेश मंडळाने डीजे चा वापर केल्यास गणेश मंडळाविरुद्ध व डीजे वाल्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल वेळप्रसंगी कोर्टात केस आणि आरटीओ मार्फत योग्य तो दंड अशा दोन्हीही कारवाई होतील असे आवाहन कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पवार व पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी केले आहे.




