केएसपी ग्रुप गणेश मंडळ ईटकूर ने पारंपारिक वाद्याच्या गजरात अगळ्या वेगळ्या पद्धतीने मिरणूकीचे आयोजन करून सर्वांचेच वेधले लक्ष
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
कळंब तालुक्यातील ईटकूर येथील गायरान वस्ती येथे वास्तव्यास असणारे आदिवासी पारधी समाज बांधव यांनी केएसपी ग्रुप गणेश मंडळाची स्थापना करून देखण्या आकर्षक गणरायाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून तब्बल आकरा दिवस मनोभावे आनंदी वातावरणात लहान थोर मंडळींनी पुजा अर्चा करून पारंपारीक हलगी लेझीम च्या तालात महिला , पुरुष , लहान मंडळींनी ठेका धरून आपल्या लाडक्या बप्पाच्या आगमन ते विसर्जन मिरवणूकीपर्यंत दररोज आनंदोत्सव साजरा केला .
दिनांक १७ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाची विधिवत पूजा अर्चा करून आकर्षक रथातून गणपती बप्पाची हालगी , लेझीम च्या ठेक्यात महिला , पुरुष , मंडळीसह लहान थोरांनी ठेका धरून अगळ्या वेगळ्या अशा पद्धतीने गणपती बप्पाच्या विसर्जन मिरवणूकीकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले .
एकीकडे कळंब पोलीसस्टेशनचे पोनि . रवी सानप आणि जेष्ठ नागरिक महासंघ यांनी डिजे मुक्त सण , उत्सव , जयंत्या साजऱ्या करण्याचे अवाहन केले असुन ईटकूर येथील या आदिवासी पारधी समाज बांधवांनी आयोजित केलेला उपक्रम सर्वांना प्रेरणादायी ठरावा .


