पानगावातील विविध गणेश मंडळांना भेटी दरम्यान आ . पाटील यांनी गावच्या नागरीकांच्या जाणून घेतल्या समस्या
पानगावात मोठ्या संख्येनी असलेल्या माजी सैनिकांना तह . पूरवठा विभाग व स्वस्तधान्य दुकानातुन न मिळणारा शिधा आणि ग्राप . स्तरावरील न मिळणाऱ्या योजनाबाबत माजी सैनिक मोहन ओव्हाळ यांनी मांडलेल्या प्रश्नावर तुमचे प्रश्न प्रधान्याने सोडवू असे आ . पाटील म्हणाले .
मंदिरास जागा दान देणाऱ्या कोळेकर यांचा आ . पाटलांनी केला सन्मान
देशभक्त न्युज - येरमाळा प्रतिनिधी / -महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा तुळजापुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि . १७ सप्टेंबर रोजी पानगाव ता . कळंब येथील संत बाळुमामा देवस्थानास भेट दिली असता त्यांच्या हस्ते यावेळी महाअरती करण्यात आली व भक्त भाविकांनी मंदिरासमोर सभामंडप , मंदिरास भक्त भाविकांस ये जा करण्यासाठी पक्का सिमेंट रस्ता व रस्त्याच्या बाजूने कडेला लाईट व्यवस्था या मागण्यामांडल्या असता संत बाळूमामा मंदिरा समोर सभामंडपास आ . पाटील यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमानंतर त्यांनी गावातील गणेश मंडळाच्या विनंती वरून येथील शिवप्रेमी गणेश मंडळ व येडेश्वरी गणेश मंडळांना भेटी दिल्या व गावच्या नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या .
यावेळी त्यांच्या सोबत नितीन दादा काळे , राजसिंह भैैय्या निंबाळकर , लक्ष्मण शिंदे - पाटील , प्रदिप फरताडे , अभिजीत गंभीरे , अशोक पवार , रामचंद्र चव्हाण , माजी सैनिक मोहन ओव्हाळ , अशोक कवडे , शिवभक अशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती .
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत बाळुमामा देवस्थानचे सुग्रीव कोळेकर, भारत माळी , प्रकाश कोळेकर , विजयकुमार कोळेकर, समाधान कोळेकर , तसेच शिवप्रेमी गणेश मंडळ पानगाव चे अध्यक्ष रोहीत चव्हाण , अक्षय बेडके ,सूरज बेडके , पांडुरंग कोळी आणि येडेश्र्वरी गणेश मंडळ पानगाव अध्यक्ष गणेश बेडके , परसराम बेडके, ऋषी बेडके यांनी मोठे परिश्रम घेतले .
संपन्न झालेल्या कार्यक्रमास येथील भगक्तगण महिला , पुरुष , तरुण मंडळी व गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .












