राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सदर कार्यक्रम डॉ. अशोकराव मोहेकर ( सचिव ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा ) यांच्या मार्गदर्शनातून साजरा करण्यात आला .
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे सांस्कृतिक विभाग आणि रासेयोच्या संयुक्त विद्यमाने जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणार्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५५ वी आणि जय जवान जय किसान चा संदेश देणाऱ्या माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची १२० व्या जयंतीनिमित्त सर्वाना शुभेच्छा देऊन अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. सुनिल पवार हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रम डॉ. अशोकराव मोहेकर ( सचिव ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा ) यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आला.
. यावेळी उपप्राचार्य डॉ.के.डी. जाधव, प्रा.आप्पासाहेब मिटकरी, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.आर. व्ही. ताटीपामुल, प्रा.डॉ.दत्ता साकोळे, प्रा. के. के. हंडीबाग, प्रा. किरण बारकुल, प्रा.सूरज गपाट, प्रा.ए.एस.बोबडे,प्रा. प्रताप शिंदे,प्रा. हंडीबाग, प्रा.नवनाथ करंजकर, अनिल पवार, अमोल सुरवसे, विनोद खरात, मारुती केचे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अधीक्षक हनुमंत जाधव, कमलाकर बंडगर,अर्जुन वाघमारे, चांगदेव खंदारे, आदित्य मडके, उमेश साळुंखे यांनी परिश्रम घेतले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
