Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अगामी तुळजापूर विधानसभेची निवडणूक मी केलेली विकासकामे व विधीमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे याच संपत्ती च्या जोरावर लढविणार - मा . आ . मधुकरराव चव्हाण

आमदार , मंत्री असताना  मी केलेली विकासकामे व विधीमंडळातील माझी जनविकासात्मक अभ्यासपूर्ण भाषणे याच संपत्ती च्या जोरावर येणारी तुळजापूर विधानसभा मी लढविणार असल्या बाबत  मा . आ मधुकरराव चव्हाण यांची देशभक्तला माहिती 

     

              देशभक्त न्युज - नळदुर्ग / (सुहास येडगे) -

मी केलेली विकासकामे आणि तुळजापुर विधानसभा मतदार संघासह मराठवाड्याच्या विकासासाठी विधीमंडळात केलेले आभासपुर्ण भाषणे ही माझी माझ्या आयुष्यातील खरी संपत्ती आहे. या संपत्तीच्या जोरावरच मी येणारी विधानसभा निवडणुक लढविणार आहे असे काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी दैनिक देशभक्त शी बोलतांना म्हटले आहे.

     सलग चार आणि एकुण पाच वेळेस आमदार म्हणुन निवडुन येणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही. मी दीर्घकाळ टिकणारा विकास करण्याचे काम केले आहे. तुळजापुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बॅरेजस, लहान, मोठे तलाव बांधल्यामुळे आज सर्वत्र पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे संपुर्ण तुळजापुर तालुका आज शेतीच्या बाबतीमध्ये सुजलाम, सुफलाम झाल्याचे पाहुन मन प्रसन्न होते. तालुक्यात शिक्षण संस्था उभारून ग्रामिण भागातील गरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही केले आहे. आम्ही उभारलेल्या शिक्षण संस्थांमध्ये आज 60 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. साखर कारखाना, सुतगिरणी उभारून युवकांच्या हाताला काम देण्याचे प्रयत्न आम्ही केले आहे. तालुक्यात विकास कामे करीत असताना कधीच आम्ही दिखावा केला नाही त्यामुळेच आज जनतेची इच्छा आहे की मी विधानसभा निवडणुक लढवावी. जनतेच्या आग्रहास्तव मी विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे मधुकरराव चव्हाण यांनी म्हटले आहे. ही विधानसभा निवडणुक माझी शेवटची निवडणुक आहे यानंतर मी कुठलीच निवडणुक लढविणार नाही. माझ्या साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलो आहे.कधीच माझ्याकडुन जातीपातीचे राजकारण झाले नाही. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करण्याचे काम आपण केले आहे. तुळजापुर पंचायत समितीच्या सभापतीपदी सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम आपण केले आहे. मी माझ्या कारकीर्दीत 21 सभापतींची नेमणुक केली आहे. यामध्ये मराठा, लिंगायत, धनगर, गुरव, बंजारा, मागासवर्गीयांसह अनेक जातीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे असेही मधुकरराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

        राजकारण करीत असताना कधीच मी घराणेशाहीचे राजकारण केले नाही. मी कधीच माझ्या मुलांना कुठल्या पदावर बसविले नाही. मनात आले असते तर केंव्हाच माझ्या मुलांना मी सभापतीसह इतर पदावर बसविले असते. मात्र नेहमीच माझा प्रयत्न सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात पुढे आणण्याचा होता आणि तो मी केलाही आहे. आजही मी कुणावरच टिकाटिपन्नी करणार नाही. आपण तालुक्याचा जो दीर्घकाळ टिकणारा विकास केला आहे त्या विकासाच्या जोरावर मी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही मधुकरराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.