२ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधुन सामाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव व यश मेडिकल फाउंडेशन येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती सप्ताहास सुरुवात करण्यात आली असुन याची सांगता ८ ऑक्टोबर रोजी होणार .
देशभक्त न्युज - येरमाळा प्रतिनिधी / -
सामाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव व यश मेडिकल फाउंडेशन येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह 2024 चे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून प्रतिमा पुजानाने झाली.
या सप्ताहामध्ये महिला मेळावा,युवक मेळावा, कामगार मेळावा कार्यशाळा, युवकांची कार्यशाळा, चर्चासत्र असे कार्यक्रम घेण्यात येणार असून या सप्तहाची दिनांक ८ ऑक्टोबर 2024 रोजी सांगता होईल.
देशात सध्या व्यसनमुक्ती आठवडा साजरा केला जात आहे. या दिवसाचा उद्देश म्हणजे व्यसनमुक्त देश घडविणे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याचे नेहमी संदेश दिले आहेत. अंमलीपदार्थ समाजाकरिता अत्यंत घातक विष आहे. कारण व्यसन फक्त मानवालाच नाही तर संपूर्ण समाजाला पोकळ करते असे येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक श्री. गणपतसिंग परदेशी यांनी सांगितले तर आजच्या या वेळेत मानव भरकटत चाललाय. आपल्या लक्ष्याला जलद गतीने प्राप्त करण्याकरिता अमली पदार्थ वापर व अस्थिर मन वाईट मार्गाने जायला भाग पाडते असे श्री. नानासाहेब देशमुख यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली तर सूत्र संचालन सौ. कल्पना कोठावळे यांनी केले व आभारप्रदर्शन सौ. प्रियंका शिंदे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
