युवासेनाच्या ईश्वर शिंदेनी मंत्री दादाजी भूसेंची भेट घेवून कळंब तालुक्यातील गावांना विकास निधी देण्याची केली मागणी
देशभक्त न्युज - मुंबई प्रतिनिधी / -
कळंब तालुका युवा सेनेचे तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे यांची भेट घेवून तालुक्यातील विविध गावांना विकास निधी उपलब्ध करून द्यावा असे साकडे घातले असुन तशी विकास कामा संदर्भात त्यांनी लेखी मागणीही केली असुन यात तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते प्राधान्याने करण्यात यावे अशीही चर्चा केली असुन मंत्री महोदययांनी शेतकऱ्याबाबत विकासकमासाठी कोणतीच अडचण येणार नसल्याचे सांगितले असल्याचे देशभक्तशी संवाद साधताना शिंदेनी ही माहिती दिली .
कळंब तालुक्यातील मौजे सात्रा या ग्रामीण भागातील रहीवाशी असलेले परंतु आपल्या स्वकृतत्वातून राजकीय क्षेत्रात आपल्या कामातुन पक्षीय नेतृत्वाकडे , नेतेमंडीळीजवळ अगळी वेगळी ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व म्हणून शिवसेना ( शिंदे गट ) कळंब तालुका युवेसेना तालुकाप्रमुख म्हणून ईश्वर शिंदेची युवकात ओळख असल्याचे चित्र आहे .

