प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन समाज बांधवांनी मोठ्य उत्साहाने केला साजरा
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -ईटकूर येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात ६८ धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी जगाला शांततेचा मार्ग देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पठेवून मा . आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे यांनी वंदन केले तर महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पत्रकार सुधाकर रणदिवे यांनी वंदन केले यावेळी युवराज शिंदे यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली आणि अमर रणदिवे यांनी धुपाने प्रतिमा पुजन केले . सर्व समाज बांधवांच्या वतीने सामुदाईक बुद्ध पुजापाठ घेण्यात आला .
शेवटी पंचशिलध्वजाचे ध्वजारोहण देशभक्तचे संपादक लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले .धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने तुकाराम शिंदे सर , संपाद लक्ष्मण शिंदे यांनी आपले विचार मांडले .
शेवटी उपस्थित धम्मबांधव रितेश लगाडे , संजय आरकडे , ग्रा . प . सदस्य सत्यदेव जगताप , मुकिंद शिंदे , अंशुमन सोणवने , बंडु रणदिवे , विकास शिंदे , तेजस लगाडे , सुरेंद्र शिंदे , राजाभाऊ शिंदे , अनिकेत शिंदे , अनुज लगाडे , अविनाश शिंदे , तात्या रणदिवे , सुरेश शिंदे , बब्रुवान रणादिवे , मालतीताई रणदिवे यांनी तथागत गौतम बुद्ध आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प आर्पण करून सर्वांनी यावेळी अभिवादन केले .
