कळंब तालुक्यातील शिक्षण म्हर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय हे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील मानांकित महाविद्यालयाच्या गणनेमध्ये आहे त्यामुळे अशा महविद्यालयाच्या अधिक्षक पदी हनुमंत जाधव यांची निवड झाल्याने महाविद्यालयासह सर्वच स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे .
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी
ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेचे संस्थापक कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी या महाविद्यालयाची स्थापना सन 1969 मध्ये केली त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली हजारो विद्यार्थी या महाविद्यालयांमधून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडले ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर (दादा) संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, संस्थेचे सहसचिव गव्हाणे भागवतराव, कोषाध्यक्ष प्रा.अंकुशराव पाटील संस्थेचे संचालक प्रा.डॉ. संजय कांबळे, प्रा.डॉ. डी. एस.जाधव , शिंदे नानासाहेब, मडके तात्यासाहेब, पवार विलास प्रा.मडके वसंत व सर्व संस्थेच्या संचालकांनी हनुमंत अच्युतराव जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तर जाधव यांचे प्राध्यापक मंडळी , कर्मचारी , विद्यार्थी , मित्रपरीवार यांच्याशी असलेले वैयक्तिक आपुल कीचे हितसबंध यामुळे सर्वच स्थरातुन त्यांचे अभिनंदण होत आहे .
