कळंब तालुका व्हॉईस मीडिया पुढाकारातुन आयोजित जल्लोष कार्यक्रमात सर्वच संघटना पत्रकार बांधावांचा समावेश .
एकमेकांना पेढे भरवून " पत्रकार एक जूटीचा विजय असो " च्या घोषणांत व फटाके फोडन सरकारच्या निर्णयाचे स्वागत .
शिवसेना शिंदे गट धाराशिव पक्ष निरीक्षक तथा युवा सेना राज्य समन्वयक नितीन लांडगे यांनीही पत्रकारांना पेढे भरवून केला आनंदोत्सव साजरा .
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
महायुतीच्या राज्य शासनाने वृत्तपञ विक्रेते व पञकारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळास नुकतीच कॕबिनेट मंञीमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली या निर्णयाचा कळंब तालुका व्हाईस आॕफ मीडिया आणि इतर संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक 11 आक्टोंबर रोजी कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडुन एकमेकां ना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पञकारांच्या या मागणीसाठी व्हाईस आॕफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला होता.सलग तीन वर्ष शासन दरबारी पाठपुरावा करीत होते या मागणीला मोठे यश मिळाले आहे.
वार्तांकन करताना पञकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते कशाचीही तमा न बाळगता सामाजीक बांधिलकीतुन बातम्या देण्याचे काम करीत आहेत अशा पञकारासाठी राज्य शासनाने गुरुवार ता.10 रोजी मंञालयात झालेल्या कॕबिनेट मंञीमंडळ बैठकीत मुख्यमंञी एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंञी अजित पवार यांनी वृत्तपञ विक्रेते व पञकार यांच्यासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या निर्णयाचे स्वागत करुन कळंब व्हॉईस आॕफ मीडिया तालुका संघटनेच्या वतीने एम डि लाईव्ह देविरोड कळंब येथे मुख्यमंञी व सर्व मंञीमंडळाचा अभिनंदनाचा ठराव घेऊन शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडुन, एकमेकांना व चौकातील नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच युवा सेनेचे राज्य समन्वयक नितीन लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन सर्व पत्रकार बांधव यांना पेढा भरवुन शुभेच्छा दिल्या .
यावेळी देशभक्तचे संपादक तथा साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचे संस्थापक - प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण शिंदे - पाटील यांनी पत्रकार , वृत्तपत्र विक्रेते यांची अनेक वर्षापासुन होत असलेली हेळसांड आता महायुतीच्या राज्य सरकारने पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांच्या साठी स्वतंत्र महामंडाळाच्या घेतलेल्या निर्णयामुळे पुढील काळात थांबणार असुन पत्रकार , विक्रेते यांच्या अस्मितेचा पश्न आता मिटला असल्याचे सांगत उपस्थित पत्रकार बांधव यांना मार्गदर्शन केले व सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले .
यावेळी व्हाईस ऑफ मिडियाचे महाराष्ट्र राज्य कार्यवाहक अमर चोंदे, शिक्षण विभागाचे राज्य प्रमुख चेतन कात्रे,कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, ज्ञानेश्वर पतंगे,तालुका कार्याध्यक्ष राम रतन कांबळे,उपाध्यक्ष रामराजे जगताप, साप्ताहिक विंगचे राजेंद्र बारगुले,अकिक पटेल,,दिपक माळी,हनुमंत पाटुळे,महेश फाटक,सतीश तवले,लक्षमण शिंदे,जयनारायण दरक,समाधान जाधव,माधवसिंग राजपूत,अशोक कुलकर्णी आदिंची उपस्थिती होती.

