मराठवाडा साहित्य परिषद केंद्रीय कार्यकारणीच्या निवडणूक प्राचाराचा भाग म्हणून प्रा.कौतीकराव ठाले - पाटील यांच्या पॅनल च्या उमेदवारांची संवाद बैठक केज येथे संपन्न
देशभक्त न्युज - केज प्रतिनिधी / -
बीड जिल्ह्यातील केज येथे रविवार दि.१३ ॲाक्टोबर २०२४ रोजी येथील शासकीय विश्रामगृहावर मराठवाडा साहित्य परिषद केंद्रीय कार्यकारणीच्या निवडणूक प्राचाराचा भाग म्हणून प्रा.कौतीकराव ठाले - पाटील यांच्या पॅनल च्या उमेदवारांची संवाद बैठक मराठवाडा साहीत्य परिषद केज चे संस्थापक अध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस दगडू दादा लोमटे , डॅा.सौ.दिपाताई क्षीरसागर हे उमेदवार प्रतिनिधी उपस्थीत होते .
सदर बैठकीत उपस्थितां समोर संस्थापक कार्याध्यक्ष प्रा.हनुमंत भोसले , संस्थापक सचिव जनार्धन सोनवणे ,संस्थापक उपाध्यक्ष महेशजी जाजू ,संस्थापक कोषाध्यक्ष अजिमेद्दिन मेजर ,मा.अध्यक्ष श्रावणकुमार जाधव ,सचिव बालासाहेब चाटे ,सचिव बाबासाहेब केदार ,प्रसिध्दी प्रमुख मधूकर दादा सिरसट ,छोटूमिया सय्यद ,सदस्य विक्रम डोईफोडे ,यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी हास्यसम्राट मेजर अजीमोद्दीन शेख यांना वाढ दिवसानिमित्त सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रा.ईश्वर मुंडे यांनी अध्यक्षीय समारोप करून .प्रा.कैतिकराव ठाले पाटील यांच्या पॅनल च्या सर्व उमेदवीरांना मतदान करणे बाबत सर्व सभासदांना विनंती केली.
संपन्न झालेल्या बैठकीचे प्रास्ताविक हनुमंत घाडगे यांनी केले तर सुत्र संचलन मसाप चे केज तालुकाध्यक्ष प्राचार्य राहूल गदळे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार मस्के यांनी मानले . या बैठकीसाठी सचिव आश्रूबा सोनवणे , महादेव केदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
