लोणी परिसरात बिबट्याच्या हल्त्यात म्हैस ठार प्रकरणी वनविभागाच्या कर्तव्या बाबत पशुपालकासह , शेतकरी , नागरिक यांच्यातुन तिव्र नाराजी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी
देशभक्त न्युज - परंडा ( फारुक शेख )
परंडा तालुक्यातील लोणी येथील शेतकरी मारुती संभाजी शिंदे यांच्या शेतात बांधलेल्या म्हशिवर रात्री अचानक बिबट्याने हल्ला केला यात महैस जागीच ठार केले असुन बिबट्याच्या हल्ल्यावेळी इतर जनावरांचा हांबरन्याच आवाज आल्यामुळे शेतकरी मालक मारुती शिंदे हे बाहेर आले असता त्यांना बिबट्या दूर पर्यंत म्हशीला घेऊन ओढत जात असताना दिसला .
त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत इतर शेतकऱ्यांना संपर्क केला असता बिबट्याला ही चाहूल लागताच ठार केलेल्या म्हशीला तिथेच टाकून फरार झाला शिंदे यांनी मुलगा उत्रेश्र्वर शिंदे यांस फोन करून ही माहिती दिली असता त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा यांना संपर्क करून सर्व गावातील वाडी वस्तीवरील लोकांना सावध केले आणि वन विभागास संपर्क केला असता वन विभागाचे कोणीच आले नसल्याने सर्व नागरिकांनी तिव्र संताप व्यक्त केला. सध्या घडलेल्या
घटनेमुळे बिवट्याच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी , पशुपालक , नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन बिबट्याचा लवकरात लवकर पकडून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे .
