Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ज्ञानदान देणाऱ्या शिक्षकांच्या समवेत ४५ वर्षानंतर सन १९७८ - ७९ च्या इयत्ता दहावी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

 ज्ञानदान देणाऱ्या शिक्षकांच्या समवेत ४५ वर्षानंतर वर्गात उपस्थित असल्याचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा भेटूया म्हणत माजी विद्यार्थी परतीच्या प्रवासाला

१९७८- ७९. इयत्ता दहावी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न       

                देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -

 कळंब येथील इयत्ता दहावी १९७८ - ७९ बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात दिनांक २० ऑक्टोबर रोजी महावीर भवन कथले चौक कळंब येथे संपन्न झाला . हा वर्ग मित्राचा स्नेह मेळावा नव्हता तर ४५ वर्षानंतर वर्ग मित्रांनी एकत्रित येऊन त्या वेळच्या शिक्षकांबरोबर एका वर्गात असल्याचा अनुभव घेतला यात शाळेची घंटा, राष्ट्रगीत खरा तो एकची धर्म ही प्रार्थना घेण्यात आली कार्यक्रमासाठी इयत्ता दहावी वर्गास शिकविलेल्या गुरुजनाना आमंत्रित करण्यात आले होते, त्यांचा माजी विद्यार्थ्यांनी आदर पूर्वक फेटा, शाल, पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली यामध्ये गुरुवर्य सेवा निवृत्त उपमुख्याध्यापक डी.जे. यादव ,जी.डी. जाधव, एम. एन. लोहार ,व्ही .एस. जाधव ,डी. एस. मोराळे, टी .एस. बारस्कर, एस.बी. तीर्थकर ,सौ. एल .एस .तीर्थकर ,व्ही.एम. जाधवर , बी.वाय. पवार, पी.एन. कांबळे ,डी .आर .बारकुल व सेवक दिगंबर माळी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास पवार हे होते उपस्थित प्रमुख पाहुणे गुरुवर्यांच्या हस्ते स्नेह मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यानंतर गुरुवर्य जी.डी.जाधव  यांनी आपल्या मनोगताची सुरुवात त्यांच्या त्यावेळच्या शैलीमध्ये अटेंन्शन ,(सावधान) या ऑर्डरने केली व जुन्या आठवणीला उजाळा दिला जीवनात शिस्त महत्त्वाची असून त्यातून यशाचा मार्ग सुखकर होतो असे त्यांनी याप्रसंगी सांगितले एम .एन .लोहार यांनी आज विद्यार्थी स्वीकारलेले काम उत्कृष्ट करीत आहेत असे सांगितले तर व्ही.एस. जाधव यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल कौतुक करून हे पवित्र काम आहे असे सांगितले तर पी. एन. कांबळे यांनी इंसान व इन्सानियत यातला फरक सांगितला ८० वर्ष वयाच्या च्या पुढील वयाचे शिक्षक तर विद्यार्थी ६० वर्षाच्या पुढील पुढील विद्यार्थी यांचा हा स्नेह मेळावा संस्मरणीय व जुन्या आठवणींना उजाळा देणारा असा आहे याचा उल्लेख करीत आपल्या भावना व्यक्त केल्या व यामुळे हे विद्यार्थी शिक्षण घेऊन गेल्यानंतर आपले कुटुंब , समाज व राष्ट्र भक्ती या यासाठी योगदान देत आहे याचे समाधान दुसरे असू शकत नाही अशा भावना व्यक्त केल्या , या वर्ग बॅचच्यावतीने आठवण म्हणून विद्याभवन शाळेस एलसीडी प्रोजेक्टर मुख्याध्यापक विलास पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन जगदीश जाजू, शोभा बर्वे यांनी तर आभार शरद खंदारे यांनी मानले, या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित वर्ग मित्र यांचा परिचय कार्यक्रम घेण्यात आला यात माजी विद्यार्थी /विद्यार्थिनी यांचा परिचय तसेच त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती प्रोजेक्टर द्वारे देण्यात येत होती व विद्यार्थी/ विद्यार्थिनी आपल्या पती /पत्नी सह परिचय व एक दुसऱ्यास पुष्पमाला अर्पण करीत होती हा अनोखा जीवनातील लग्न घटीकेचा आनंदही आपल्या या वर्गमित्रांसोबत घेत होती. यानंतर सुरुची भोजन व दुपारच्या सत्रात मनोगते व विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये ,श्रीधर भवर, त्यांच्या पत्नी सौ, मीनाक्षी भवर, मणियार तसद्दुक,गोपाळ झंवर, माधवसिंग राजपूत, ,रेखा कुलकर्णी, शीला लटंगे यांनी सहभाग घेतला यानंतर थोडा हटके व आपल्यातील सुप्त कला गुणांचा आविष्कार म्हणजे गीत ,शेर शायरी, मी मिक्री, डान्स, उचललेल्या चिठ्ठीद्वारे सादरीकरण तसेच फन - गमतीचा खेळ यामध्ये जोडीदारासह टोपी तसेच फुगा तोलन हा खेळ प्रकार सादर केला गेला या कार्यक्रमात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी बक्षीसे देण्यात आली. टोपी खेळामध्ये प्रथम जोडी जयश्री अभय देवडा, द्वितीय स्वाती सुरेश पंडित, तृतीय मंजू गोपाळ झंवर तर फुगा तोलन यामध्ये प्रथम सुरेखा शरद खंदारे, द्वितीय माधुरी शाम देशपांडे, तृतीय रेखा कुलकर्णी व महानंदा जाधव यांनी बक्षीस मिळवली या खेळाचे संचलन अंकिता देवडा यांनी केले मेळाव्यास उपस्थित सर्व विद्यार्थ्यानां संयोजन समितीच्या वतीने आकर्षक प्रवासी बॅग भेट म्हणून देण्यात आली . गोपाळ झंवर यांनी मेळावा आयोजित केल्याबद्दल पुढाकार घेणाऱ्या वर्ग मित्रांचा शाल , बुके देवुन सत्कार केला ,शेवटी पुन्हा भेटूया हसत खेळत राहूया आनंदी जीवन जगूया हा संदेश,४५ वर्षा नंतरची भेट, व डोळ्यातील आनंद अश्रू यांना वाट काढून एकमेकांना भेटत निरोप घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अभय देवडा, बाबू पौळ, शरद खंदारे, जगदीश जाजू, शोभा बर्वे, विक्रम गायकवाड , अंकुश कसबे, राजेंद्र लटेंगे, प्रदीप मुंडे,  सुधाकर चौरे, गौतम लोढा, यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.