निवडणूकीच्या आखाड्यात कोण कुणाचे बारा वाजविणार याकडे मतदारासंह सर्वाच्या नजरा तर उमेद्वार मात्र आपली भूमिका मतदारा पर्यंत पोहंचविण्यासाठी लागले तयारीला
देशभक्त न्युज - धाराशिव - कळंब प्रतिनिधी - /धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघातून बऱ्याच साऱ्या राजकीय घडामोडीच्या नाट्यनंतर दि . ०४ नोव्हेंबर रोजी उमेद्वाराचे नामनिर्देशन पत्र माघार व निवडणूक रिंगणातील राहिलेले उमेद्वार यांची यादी नुकतीच निवडणूक विभागाकडुन प्रसिद्ध करण्यात आली असुन धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघातुन एकूण १२ उमेद्वार आता निवडणूक रणधुमाळीच्या आखाड्यात आपले नशिब अजमावत असुन या निवडणूक कुरूक्षेत्रात कोण कुणाचे मतदारांच्या मतदान रूपी आशिर्वादाने बारा वाजविणार याचे स्पष्ट चित्र निवडणूकीनंतर दिसणार असुन दि . ०४ नोव्हेंबर रोजी आपली उमेद्वारी फायनल व चिन्ह वाटप झाल्यानंतर झाल्यानंतर या मतदार संघातील उमेद्वार आपआपल्या भूमिका मतदारांसमोर घेवून जाण्यासाठी कामाला लागल्याचे दिसुन येत आहे .
धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरलेले पक्षनिहाय उमेद्वार - अजित बप्पासाहेब पिंगळे , शिवसेना (शिंदे गट ) , कैलास बाळासाहेब घाडगे - पाटील , शिवसेना (उबाठा गट ) , देवदत्त भागवत मोरे , महाराष्ट्र नवनिर्माण सेना , लहु रघुनाथ खुणे , बहुजन समाज पार्टी , ॲड . प्रणित शामराव डिकले , वंचित बहुजन आघाडी , डॉ . रमेश सुबराव बनसोडे , भारतीय जनविकास आघाडी , सिराज उर्फ पापा फतरुद्दीन सय्यद , टिपू सुलतान पार्टी , श्रीहरी माळी , राष्ट्रीय समाज पक्ष , अशोक अनंत कसबे , अपक्ष , दत्ता मोहन तुपे , अपक्ष , नितीन गजेंद्र काळे , अपक्ष , विक्रम रघू काळे , अपक्ष हे एकूण १२ उमेद्वार निवडणूक रिंगणात उतरले असुन धाराशिव - कळंब मतदार संघातील ३७४७६८ एकूण स्त्री , पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावून आपला आमदार निवडणार आहेत .




