भाजपा कळंब तालुका मा .चिटणीस प्रदिप उत्तेश्वर फरताडे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपाला ऐन विधानसभेच्या धामधुमित भगदाड पाडुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला जाहिर प्रवेश..
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
कळंब तालुक्यातील इटकुर येथील भाजपा माजी . तालुका चिटणीस प्रदीप फरताडे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह ५ नोव्हेंबर रोजी धाराशिव - कळंब विधानसभेचे मा . आ . तथा शिवसेना ( उबाठा ) गटाचे विद्यमान उमेद्वार , धाराशिव शिवसेना ( उबाठा ) चे जिल्हा प्रमुख कैलास घाडगे - पाटील यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केला . यावेळी फरताडे यांच्यासह अभिजित गंभिरे, कैलास माळी, केशव कसपटे, वैभव फरताडे, दिनकर क्षिरसागर, चिंतामणी फरताडे, नितीन फरताडे, रणजित गंभिरे, अमर आडसुळ, धनंजय आडसुळ, सुरेश देटे, गौरव काळे, बबलू शिंदे, भागवत काळे, कान्हा जगताप, महेश आडसुळ, सोनू कदम, विशाल दिवाणे, ज्योतिराम फरताडे, रामेश्वर शिंदे, विकास शिंदे, उमेश आडसुळ, महेश हावळे, शिवाजी गंभिरे, विलास बावळे, अशोक बावळे, विशाल दिवाणे, राजाभाऊ आडसुळ, गणेश बावळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
या सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मा . आ . कैलास घाडगे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.. यावेळी शिवसेना उबाठाचे. कृउबास संचालक भारत सांगळे , मालोजी पाटील , बाळासाहेब गंभीरे , रितेश लगाडे शिवसेना पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते..
यापूर्वीच मागील कांही दिवसापूर्वी मराठा सेवक अभियसिंह दत्तात्र्य आडसुळ यांनी आपल्या मित्र मंडळीसह शिवसेना उबाठा गटात जाहिर प्रवेश केला आहे . यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत ईटकूर येथून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केलेल्या या मंडळींचा कितपत परिणाम होणार हे ही येणार काळ ठरविणार आहे .
धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडूनही शिवसेना (उबाठा ) गटात जाहिर प्रवेश केलेल्या सर्वांचे अभिनंदण व पुढील कार्यास दिल्या शुभेच्छा .


