पतीच्या विजयासाठी पत्नी विधान सभेच्या प्रचारार्थ रणसंग्रामात
याचाच भाग म्हणून भाजपाचे कळंब तालुकाध्यक्ष परंतु धाराशिव - कळंब मतदार संघातील शिवसेना (शिंदे ) गटाकडुन उमेद्वारी मिळाल्यानंतर महायुतीचे उमेद्वार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक म्हणून ग्रामीण भागासह जिल्ह्यात परिचित असणारे अजित पिंगळे यांनी मतदार संघ पिंजून काढण्यास कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेवून तगडी सुरुवात केली असुन ते आपल्या गाव भेटी व मतदारांशी चर्चा करताना महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात केलेल्या विकासात्मक कामांचा लेखा - जोखा सांगून विजयी करण्याचे विनम्र आवाहन करत आहेत . तर त्यांच्या पत्नी सौ . रंजना अजित पिंगळे याही गाव भेटी दरम्यान घरोधरी जावून मतदारांना त्या महायुतीच्या सरकारने राबविलेल्या विविध योजना बाबत मतदारांत माहिती सांगण्यात मागे नाहीत . धाराशिव - कळंब मतदार संघात समाजीक पारदर्शकता व प्रामाणिकता प्रस्थापित करण्यासाठी तळागाळातील जनतेच्या मुलभुत प्रश्नांची जाण असलेल्या अजित पिंगळेंना विजयी करण्याचे त्या मतदारांना अवाहान करीत आहेत .याप्रसंगी शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे .





