महाविकास अघाडीचे उमेद्वार कैलास घाडगे - पाटलांना भारतीय परिवर्तन सेना पार्टी पक्षाचा लेखी जाहिर पाठींबा देताच दिपक भाऊ ताटे धाराशिव - कळंब विधान सभा मतदार संघात आपल्या पक्षाच्या कर्यकर्त्यांची टिम घेवून प्रचाराच्या लागले कामाला .
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघाच्या आमदारकीचा राजकीय आखाडा चांगलाच पेटला असुन या विधानसभा मतदार संघातील उमेद्वार आप आपल्या कार्यकर्त ,पदाधिकारी , यांच्या लावाजम्यासह प्रचाराच्या कामाला लागले असुन याच मतदार संघात महाविकास आघडीचे शिवसेना ( उबाठा ) गटाचे उमेद्वार मा . आमदार कैलास घाडगे - पाटील यांना विविध पक्षातील पदाधिकारी पक्षाचे प्रमुख हे पाठिंवा देत असुन ऐन निवडणूकीच्या धामधुमीत भारतीय परिवर्तन सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ ताटे यांनी कैलास घाडगे पाटलांना आपल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठक निर्णयातुन भापसे पक्षाच्या महासचिव मा . जिप . सदस्या राधाताई दिपक ताटे आणि महाराष्ट्रराज्याचे पक्षप्रवक्ते जालिंदर उपाडे आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये जाहिर पाठींबा दिला आहे . महाविकास आघाडीचे उमेद्वार कैलास घाडगे - पाटील यांनी भापसे पार्टी च्या जाहिर पाठिंबा दिलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभार मानले .
दिपक ताटे यांनी यापूर्वी आपल्या मस्सा या गावी गावच्या विकासात्मक दृष्टीकोणातुन अनेक कामे व विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत तर त्यांच्या पत्नी सौ . राधाताई दिपक ताटे या जिप . सदस्या असताना जिप गटात विकास कामांना गती देण्याचे काम केले आहे .
दिपक भाऊ ताटे यांनी पाठींबा जाहिर करताच दि . ७ नोव्हेंबर रोजी मोहा , खामसवाड़ी , गोविदपूर या विधानसभा मतदार संघातील लोकसंख्येनी मोठ्या असलेल्या गावांना भेटी देवून महाविकास आघाडीचे उमेद्वार कैलास घाडगे - पाटलांच्या प्रचाराचा झंजावात सुरु केला .महाविकास आघाडीचे उमेद्वार कैलास घाडगे यांची यापूर्वीची धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघातील विकासात्मक कामे करण्याचे कौशल्य , शांत , संयमी व्यक्तीमत्वाने जनतेशी त्यांनी निर्माण केलेले आपुलकीचे नाते आणि पुढील काळात जनतेनी त्यांना निवडुन दिल्यास ते नक्कीच धाराशिव - कळंब विधान सभा मतदार संघाचा सर्वांगिण विकासात्मक चेहरा बदलण्याची त्यांच्यात धमक आहे म्हणून मी त्यांना माझ्या पक्षाच्या वतीने पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारार्थ कामाला लागल्याचे ते मतदारांना भावनिक सादही घालत आहेत .
