देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे-पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सभा धाराशिव मध्ये होत असुन त्यांच्या खास भाषतील ठाकरी शैलीच्या भाषेतुन से दि . १२ नोव्हेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या सभेतुन विरोधकांचा कसा समाचार घेणार याकडे महाविकास आघाडीचे नेतेमंडळी , पदाधिकारी , कार्यकर्त यांचे लक्ष लागले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे-पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मंगळवारी धाराशिवमध्ये येणार आहेत. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या उलथा पालथीमध्ये शिवसेनेचे तब्बल चाळीस आमदारांनी बंड करून भाजपासोबत सरकार स्थापन केले होते. या बंडामध्येही कैलास पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारासोबत राहीले होते. म्हणून त्यांची उमेदवारी पहिल्या यादीत घोषित करण्यात आली. या सभेतून उद्धव ठाकरे मतदारांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना काय संबोधित करणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

