मी अजुन म्हातारा झालेलो नाही ; महाविकास आघाडीचे सरकार आल्यासच म्हातारा होईल - खासदार शरद पवार
भूम - परंडा - वाशी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ( शरद पवार ) गटाचे राहुल भैय्या मोटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा .शरदचंद्रजी पवार यांच्या सभेचे १० नोहेंबर रोजी परंडा येथील आठवडा बाजार मैदान येथे सकाळी ११ वाजता सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेच्या प्रारंभी खा .पवार यांच्या हस्ते कै. ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सभेला सुरुवात करण्यात आली .
यावेळी उपस्थित मतदारांशी संवाद साधताना खा .पवार असे म्हणाले की , मी अजुन म्हातारा झालेलो नाही महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यावेळेस मी म्हातारा होईल पुढे बोलताना ते असे ही म्हणाले की ,
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास महिलांना महिन्याला तीन हजार रुपये व मोफत एसटी प्रवास आणि सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला चार हजार रुपये मानधन देण्यात येईल याबरोबरच सर्व शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येईल .
यावेळी व्यासपिठावर मतदारांशी संवाद साधण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित दादा पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल भैया मोटे ,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब खरसडे , काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे , काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश परदेशी , काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नुरुदिन चौधरी ,शिवसेना तालुकाप्रमुख दादा पाटील , शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड . संदीप पाटील ,परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन , फेडरेशनचे संचालक बापू मिस्कीन , शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . या विराट सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता सभा संपन्न झाल्या नंतर शेवटी माजी आमदार कै. ज्ञानेश्वर तात्या पाटील यांना दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

