Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धाराशिव व कळंब तालुक्याचा विकास आराखडा माझ्याकडे तयार- पिंगळे

 धाराशिव व कळंब तालुक्याचा विकास आराखडा माझ्याकडे तयार- पिंगळे 

       

 देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -

धाराशिव - कळंब तालुक्यात मराठवाडा कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी आणण्यासाठी आमदार कैलास पाटील यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. तर सत्तेच्या काळात देखील धाराशिव व कळंब तालुक्यासाठी विशेष विकास निधी आणला नाही. शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून धाराशिव शहर बगीचांचे शहर करण्यासह कळंब शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे सुशभीकरण करणे. तसेच धाराशिव व कळंब तालुक्याचा विकास आराखडा माझ्याकडे तयार असल्याची माहिती महायुतीचे धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजित पिंगळे यांनी दि.१० नोव्हेंबर रोजी दिली.

धाराशिव येथील हॉटेल ॲप्पलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे तुळजापूरचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे दत्ताभाऊ कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.सुशील शेळके, सचिन तावडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पिंगळे म्हणाले की, आमदार कैलास पाटील यांनी त्यांची सत्ता असतानाच्या काळात म्हणजे अडीच वर्षाच्या काळात मतदार संघातील रखडलेल्या प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एकही बैठक लावली नसल्याचा आरोप त्यांनी केला. मी शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे व स्व गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराने प्रभावित होऊन मला मतदानाचा अधिकार नसल्यापासून शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. तर १९८९ साली शिवसेनेचे पहिले लोकसभेचे उमेदवार यशवंत पेठे यांचा प्रचार केला असल्याचे त्यांनी सांगितले. मला कुठल्याही पदाची लालसा नव्हती. मात्र २०१९ ला मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असताना बाहेरून आलेल्यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढविली. त्यानंतर मला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे काम करण्यासाठी ऑफर आली होती. मात्र मी शिवसेनेच्या विचाराशी मिळती जुळती भारतीय जनता पार्टी असल्यामुळे मी प्रवेश केला. माझी उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निश्चित केली असल्याचे त्यांनी सांगितले. धारासिंग व कळंब या तालुक्यात अनेक विकास कामे करण्यासारखी होती. मात्र आमदार कैलास पाटील यांनी मी विरोधी पक्षाचा आहे अशी बोंबाबोंब करण्यापलीकडे काही केला नाही. मात्र रोजगार निर्मिती प्रकल्प आणण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी एकही बैठक घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मेडिकल कॉलेजचा अर्धवट प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. तर तुळजापूर तीर्थक्षेत्रासाठी रेल्वे आणण्यासाठी ठाकरे सरकारने ५० टक्के निधी देण्यासाठी बैठक घेतली नसून धाराशिव येथील विद्यापीठ उपकेंद्राचे पूर्ण विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला सुधारित मान्यता दिली. मेडिकल कॉलेज मंजूर केले. तर ठाकरे यांच्या काळात २०२१ व २०२२ मध्ये अतिवृष्टीचे अनुदान व पीक विमा घेण्यासाठी साधी बैठक देखील घेतली नसून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सत्ता बदलल्यानंतर पीक विमा रक्कम मिळणार असे दिसताच आ. कैलास पाटील यांनी आमरण उपोषणाचे नाटक केले असल्याचा घणाघात त्यांनी केला. 

धाराशिव व कळंब शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते चांगले झाले पाहिजेत, शिराढोण येथे एमआयडीसी स्थापन झाली पाहिजे, कळंब येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे सुशभीकरण, कसबे तडवळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, धाराशिव व कळंब येथे मुस्लिम समाजासाठी शादीखाना, येरमाळा येथील महाबीज बियाणे महामंडळाची जागेवर शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी मी विकास आराखडा तयार केला असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.