शहरातील मुस्लिम समाजाच्या सांस्कृतीक संभागृहाच्या नोंदी गायब असल्याने हे सभागृह वादाच्या भोवऱ्यात सापडले असुन याबाबत चौकशीच्या मागणीचे निवेदन
नगरसेवक शामसुंदर नारायणकर आणि सा . विकासपर्व चे संपादक महेबुब फकीर छायाचित्रात निवेदन देताना .
देशभक्त न्युज - लोहारा प्रतिनिधी / -
याबाबत सविस्तर बातमी अशी की ,लोहारा शहरामध्ये माझी राज्यमंत्री बस्वराज पाटील यांच्या निधीतुन सन २००३ / ४ मध्ये स .न ११८ मध्ये शहरातील मुस्लीम समाजाच्या सामाजिक कार्यासाठी सांसकृतीक सभागृह बांधुन देण्यात आले होते .परंतु आज त्या सभागृहाची दुराअवस्था झाल्याने त्याच्या दुरुस्ती साठी आमदार / खासदार निधीतुन फंड घेऊन दुरुस्ती व्हावी या हेतुने नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांनी मुख्याअधिकारी नगरपंचायत कार्यालय येथे रितसर अर्ज करून संबधीत सभागृहाच्या कागदपत्राणी मागणी केली असता सदर सभागृहाचे कागदपत्र उपलब्ध नाही म्हणुन लेखी त्यांना पत्र देण्यात आले आहे
शासन दरबारी नोंद नसलेली परंतु मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्यासाठी बांधण्यात आलेले हिच ती सभागृहाची " डागडुजी व दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असणारी इमारत " छायाचित्रात दिसत आहे .
.त्यामुळे त्यांनी तहासिलदार लोहारा यांना सदर सभागृहाची मोजनी करून ७ / १२ व ८ आ नोद करण्याचे आदेश करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिले आहे . दिलेल्या निवेदनावर नगरसेवक शामसुंदर भीमराव नारायणकर, महेबुब फकीर आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवेदनाच्या प्रति , तहसिलदार लोहारा ,जिल्हा अधिकारी धाराशिव , जिल्हा नियोजन समिती धाराशिव ' सार्वजनिक बांधकाम विभाग लोहारा , मुख्याधिकारी लोहारा यांना देण्यात आल्या आहेत .

