सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटना धाराशिवजिल्ह्याच्या वतीने परभणी येथील संविधान प्रतिमेच्या विटंबना प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी यांना मागण्याचे निवेदन
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
मंगळवार दि. ११-१२-२०२४ रोजी परभणी येथे केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिमेच्या विटंबणेच्या निषेधार्थ आज सम्यक विद्यार्थी आंदोलन धाराशिव यांच्या वतीने मा. जिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परभणी येथे झालेल्या विटंबना प्रकरणातील अटक केलेल्या सोपान दत्ताराव पवार याच्यावर कडक कार्यवाही करावी व याच्या मागे कोणाचा हात आहे त्याचाही शोध घ्यावा व त्यांच्यावरही कडक कार्यवाही करावी म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष विवेक जाधव,मनोज वाघमारे,चेतन मस्के ,रोहित वाघमारे,अभिषेक साबळे,रितेश गायकवाड, समाधान करपे उपस्थित होते .
