Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

परभणी व मस्साजोग येथील प्रकरणी निषेध व आरोपीवर कठोर कारवाई बाबत निवेदन

 परभणी व मस्साजोग येथील प्रकरणी निषेध व आरोपीवर कठोर कारवाई बाबतचे निवेदनकर्त्यांचे निवेदन येरमाळा पोस्टेचे पोनि . क्षिरसागार यांनी स्विकारून प्रशासनस्तरावर सदरील निवेदनकर्त्यांच्या भावना कळविण्याचे दिले आश्वासन 

 


                 देशभक्त न्युजयेरमाळा प्रतिनिधी / -

परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील संविधान शिल्प प्रतिकॄतीची विटंबना करण्यात आल्याच्या निषेधार्थ येरमाळासह परिसरातील भिम अनुयायांनी एकत्रित येवून आपल्या भावना व्यक्त करीत सदरील घडलेल्या घटनेचा निषेध करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परभणी येथील समाज बांधवावर कोंम्बींग ऑपरेशन दरम्यान पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असलेला लाठीचार्ज व अमानुष अत्याचार मुख्यमंत्र्यांनी थांबविण्याचे आदेश देण्याची आंदोलन कर्त्यांनी निवेदनात मागणी केली आहे.  तसेच मस्साजोग ता .केज येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हात्या करण्यात आली त्याचा तपास सिआयडी. विभाकडे वर्ग करून त्या कुटुंबाला नाय द्यावा .कायदा व सुव्यस्थेचा प्रश्र्न सरकारने मिटवून महाराष्ट्र राज्यात शांतता निर्माण करावी . परभणी येथील समाज बांधवांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे.

या मागण्यांचे निवेदन येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्षिरसागर यांना देण्यात आले . निवेदन देताना प्रातिनिधीक स्वरूपात  संविधान  पार्टीचे संस्थापक / अध्यक्ष उमेश भालेराव , दलित चळवळीचे बाळासाहेब पायाळ , येरमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष /संपादक कुंदन कांबळे , संपादक बाळासाहेब चंदनशिवे , वंचित बहुजन आघाडीचे नेते पोपट ओव्हाळ , युवा नेते सुधीर ओव्हाळ , यांच्या सोबत यावेळी येरमाळ्यासह परिसरातील पानगाव , वडगाव (ज .) ,शेलगाव दि. , सापनाई, कडकनाथवाडी, रत्नापूर , उमरा, परतापूर, बाभळगाव, दहिफळ , मलकापूर येथील भिमसैनिक व संविधान प्रेमी अनुयायी निवेदन देताना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.