इशिता हाडुळे अबॅकस स्पर्धेत देशात दहावी आल्याने तिच्या या यशा बद्दल सर्व स्तरातुन तिचे कौतुक व अभिनंदणाचा वर्षावर होत आहे
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
31 जाने 2025 रोजी कोल्हापूर येथे प्रो ऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन संपन्न झाली. या स्पर्धेत कळंब येथील ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरची विद्यार्थिनी इशिता सचिन हाडुळे हिने अबॅकसमध्ये लहान गटात राष्ट्रीय पातळीवर 'अ' कॅटेगरी इयत्ता २ री मधून 10 वा क्रमांक पटकावला. अबॅकस स्पर्धेत इशिता हाडुळे हिने ४ मिनिटे १० सेकंदात १०० गणिते अचूक सोडवले. या स्पर्धेत देशातील विविध राज्यातील एकूण 5600 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तिच्या यशाबद्दल प्रो ऍक्टिव्ह अबॅकसचे संचालक गिरीश करडे व संचालिका सारिका करडे, तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन इशिताला सन्मानित करण्यात आले. तिच्या या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असुन सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदणाचा वर्षाव होत आहे . इशिता सचिन हाडुळे हिला ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या संचालिका प्रा. सौ. रेशमा सावंत (शिनगारे) मॅडम, प्रा. डॉ. संजय सावंत तसेच तिचे आई- वडील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच या स्पर्धेतील प्राविण्या बद्दल ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर ला 'बेस्ट सेंटर पुरस्कार' देखील देण्यात याला.
