घटनेची तात्काळ चौकशी करा . माहिती आधिकार कार्यकर्ता यांची सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी
देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी / - ( फारूक शेख )
परंडा येथील सार्वजनिक बांधकाम उप विभाग परंडा कार्यालयाच्या अधिकार कक्षेतील कात्राबाद रोड येथे कॉलनी असुन त्या कॉलनीमध्ये दहा बारा झाडे चिंचेचीआहेत त्या झाडापैकी कांही झाडांना चिंचा लागल्या असून त्या झाडाच्या चिंचा विक्री साठी सार्वजनिक बांधकाम उप विभाग येथील कर्मच्यारी यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता व जाहीर प्रगटन न करता, लिलाव न पुकारता कर्मच्या-यांनी अधिकाऱ्याच्या परस्पर चिचांची विक्री करून विल्हेवाट लावण्याचा महाप्रताप केला़ असल्यामुळे या दोषी कर्मच्याऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी यासाठी येथील फारूक शेख , कानिफ सरपने ,विजय मैहर , जमिर शिकलकर ,शिवाजी करळे यांनी आपल्या स्वाक्षरीनिशी तात्काळ निवेदन देवून घटनेची तात्काळ चौकशी करा अशी माहिती आधिकार कार्यकर्ते यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली असुन दिलेल्या निवेदनावर कारवाई न झाल्यास संघटने मार्फत सबंधित कार्यालया पुढे आदोलन करण्यात सज्जड झ्शाराही देण्यात आला आहे .

