भाजपा संघटन पर्वासाठी एक हजार सदस्य नोंदणी करून भाजपा पक्ष वाढविण्याकामी उतुंग कामगिरी केल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गदळेचे केले विषेश अभिनंदण
देशभक्त न्युज - केज प्रतिनीधी / -
भाजपाचे युवा नेते राहुल भैय्या गदळे यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पत्र पाठवून त्यांनी पक्ष सदस्य नोंदणी कामी केलेल्या विषेश कामगिरी बद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील विडा जिल्हा परिषद गटा मधील दहिफळ , वडमाऊली येथील राहुल भैय्या गदळे यांनी भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्वा मध्ये तब्बल १ हजार सदस्य नोंदणी करून भाजप पक्ष वाढविण्यासाठी सहभाग घेतल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पत्र पाठबून त्यांचे अभिनंदण केतो असुन या त्यांच्या कार्याबद्दल आमदार नमिताताई मुंदडा ,भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय भैय्या मुंदडा यांनीही युवा नेते राहुल भैय्या गदळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
गदळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केजच्या आमदार नमिता ताई मुंदडा यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील गावागावा मध्ये व वाडी वस्ती तांड्यावर जाऊन भाजप सदस्य नोंदणी करून तळागाळातील नागरिकांपर्यंत भाजप पक्षाचे विचार पोहचवण्याचे काम ग्रामीण भागातून करीत एक हजार सदस्य नोंदणी करून भाजप पक्षाचे संघटन मजबूत व बळकट केले आहे.
याशिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठी दूतही त्यांनी जोडून घेतल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी व आमदार नमिता ताई मुंदडा, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा यांनी युवा नेते राहुल भैया गदळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गदळे यांच्या या भाजपा पक्षीय बांधणीचे विषेश कौतुक होत आहे .
