हरित आणि स्वच्छ सुंदर बार्शी बनविण्याच्या ध्येयाने वृक्ष संवर्धन समिती सकाळी वृक्षांच्या सेवेत रस्त्यावर
"वृक्षवल्ली आंम्हा सोयरे , वनचरे " या काव्यपंक्तीस स्मरून बार्शीतील वृक्षसंवर्धन समितीचे वृक्षप्रेमी सकाळी - सकाळी पाण्याचा पाईप हतात धरून रस्त्यावरील डिव्हायडरमधील रंगीबेरंगी फुलांच्या झाडांना पाणी आणि रस्त्यावर येणाऱ्या झाडांची कात्रीने कापणी अगदी मनोभावे करतात .
देशभक्त न्युज - बार्शी प्रतिनिधी
ध्यास स्वच्छ आणि सुंदर बार्शीचा आणि हिरवीगार बार्शी करण्याच्या ध्येयाने प्रेरित होवून बार्शीतील वृक्षप्रेमी मंडळीनी एकत्रित येवून वृक्षसंवर्धन समिती नेमूण व आदर्श उद्योग समुह आणि वृक्षप्रेमी देणगीदार यांच्या सौजन्याने स्वच्छ, सुंदर , हिरवीगार बार्थी शहर बनविण्याच्या ध्येय्याने प्रेरित होवून कामास सुरुवात केली व ते सत्यात उतरविण्याचे अनमोलकार्य सकाळच्या प्रहारी रस्त्यावरील झाडांना पाणी घालून , रस्त्यावर झुलेल्या झाडांची कापणी करुन रस्त्यांना , बार्शी शहराला सुंदर बणविण्याचे काम वृक्ष संवर्धन समितीने शिलेदार अगदी मनोभावे करताना रस्त्यावर दिसतात .
घरी येणाऱ्या पाहुण्यांचे " अतिथी देवो भव " याप्रमाणे जसे आपण स्वागत अदरातिथ्य करतो त्याप्रमाणेच वृक्ष हे आपले पाहुणे असुन त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य समजून बार्शीतील वृक्षसंवर्धन समितीचे पदाधिकारी , सदस्य सकाळी - सकाळी पाण्याने भरलेल्या सिंटॅक्सची गाडी घेवून वृक्षा संदर्भात हताला पडेल जे दिसेल ते काम करण्यासाठी ही मंडळी रस्त्यावर उतरून अगदी लगीनघाई सारखी धावपळीत असते .
प्रासंगिक / बार्शी कौतुक स्तुत्य उपक्रमाचे
खरोखरच तन मन धनाने बार्शी शहराच्या सुंदरतेच्या गतवैभवात भर घालू पाहणाऱ्या आणि सर्व नागरीक आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या मनाला हिरव्या रंगाने व विविध फुलांने बहरलेल्या रस्त्यांकडे पहिले की मन अगदी प्रसन्न व्हावे असे कार्य करणाऱ्या वृक्षसंवर्धन समितीच्या कामाचे कौतुक होत असताना दिसत आहे .



