सोशल मिडीया व इतर ठिकाणी वादग्रस्त पोष्ट करुन कायदा व सुव्यवस्थेचा भंग कराल तर खबरदार
पोनि रवी सानप यांचा शांतता कमिटी बैठकीत इशारा
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर अपलोड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आणि शहरातील शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास, कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कळंब पोस्टेचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी दिला आहे. सध्या राज्यभर औरंगजेबच्या कबरीवरून वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टमुळे काही भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. उमरगा तालुक्यात एका तरुणाने वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने वादंग झालेलं पाहायला मिळालं. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुडी पाडवा हे सण पुढील काही दिवसात येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कळंब शहरात पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सर्व समाजातील प्रमुख , सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत बोलताना पोनि . सानप यांनी सोशल मिडीया व इतर ठिकाणी वादग्रस्त पोष्ट करुन कायदा व सुव्यवस्थेचा भंग कराल तर खबरदार असा इशारा देवून अशा प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई होणार असल्याचे सांगितले .पुढे बोलताना ते असेही म्हणाले की , अफवांवर विश्वास न ठेवता, यापूर्वी जसे शहरात एकतेने राहत होते तसेच एकमनाने राहावे, असे आवाहन केले.
तर वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांना तात्काळ ताब्यात घेत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती देखील सानप यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले दोन्हीकडील तरुण आशाप्रकारे पोस्ट करत आहेत, आम्हाला पुरावा मिळत आहे. आम्ही दोन्हीकडील तरुणांवर गुन्हे दाखल करणार आणि संबंधित पोस्ट पुरावा म्हणून वापरणार, असेही शेवटी सानप म्हणाले. यादरम्यान शहरातील सर्व समाजातील मंडळी या बैठकीला उपस्थित होती .
सण उत्सव , जयंत्या यामध्ये सर्वांनी मिळुन आपल्या इतर भावंडांना कर्कश डॉल्बी ,डिजे अशा वाद्याचा त्रास होणार नाही कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची जाण ठेवून पारंम्पारीक वाद्य यामध्ये बॅंन्ड, जहांज पथक , सनसुरई, सामाजिक प्रबोधनात्मक देखावे , स्पर्धा परिक्षा , सांस्कृतिक कार्यक्रम असे समाज उपयोगी उपक्रम राबवावेत असे अवाहनही शेवटी . कळंब पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरिक्षक रवी सानप यांनी उपस्थित सर्वांना केले .
ही बैठक यशस्वी करण्यासाठी कळंब पोस्टेचे पोलीस कर्मचारी यांच्यासह पोलीस नाईक एस के मायंदे यांनी परिश्रम घेतले .
