राजकारण आणि समाजकारण दोन्ही बाजूंना न्याय देण्याऱ्या कैलास शिंदे यांना समाजभूषण पुरस्कार
देशभक्त न्युज - उमरगा प्रतिनिधी / -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती महोत्सव समिती धाराशिव यांच्या माध्यमातुन जिल्ह्यात समाजिक कार्यातुन समाज विकासासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते या वर्षी हा पुरस्कार राजकारण आणि समाजकारण या दोन्ही बाजू सक्षमपणे पेलून त्याला योग्य न्याय देणारे उस्मानाबाद मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी . जिप . सदस्य कैलास चिंतामणराव शिंदे यांना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमास राष्टवादी कॉंग्रेसच्या नेत्या सक्षणा सलगर, कॉंग्रेसचे नेते विश्वास अप्पा शिंदे, जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, अध्यक्ष मुकुंद घुले, यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
